[rank_math_breadcrumb]

कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या आवाजातल्या ह्या गाण्याने इम्रान हाश्मीला बनवलं स्टार, पण हे म्युझिक ठरलं होत कॉपी

चित्रपटसृष्टीमध्ये आणि चित्रपट उत्तम गाजले आहेत त्याचे एक कारण म्हणजे त्यातील गाणे. गाण्यांमुळे चित्रपटाला एक वेगळाच दर्जा मिळत असतो. तसेच त्या गाण्यांना त्या गायकांनी गायलेल्या सुंदर आवाजामुळे ही अनेक प्रेक्षक तृप्त होतात. असेच मनाला स्थिर आणि शांत करणारे गायक फार कमी असतात, तर असेच एक उत्तम गायक म्हणजेच कृष्णकुमार कुन्नाथ, जे केके या नावाने देखील ओळखले जात होते. पण आता आपल्यात जरी नसले तरी त्यांची गाणी पिढ्यानपिढ्या श्रोत्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. पण तुम्हाला माहीत आहेत का या त्यांच्या सर्वात गाजलेल्या गाण्यांपैकी एकामागे एक रंजक आणि थोडी वादग्रस्त कहाणीसुद्धा आहे.

2006 साली ‘गँगस्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर अनुराग (anyraag)बसू याचा हा चित्रपट होता तर  या चित्रपटाने कंगना रणौतला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली होती. तर त्याच्या संगीताने इम्रान हाश्मीला हिट रोमँटिक गाण्यांचा पोस्टर बॉय बनवले. या चित्रपटातील ‘तू ही मेरी शब है’ हे गाणे विशेष गाजले. केके यांचा भावपूर्ण आवाज आणि सईद कादरी यांच्या गीतांमुळे हे गाणे लगेचच एक ‘कल्ट क्लासिक’ बनले. दक्षिण कोरियातील सेऊलच्या रस्त्यांवर चित्रित झालेले हे गाणे आजही प्रेमाचे एक कालातीत प्रतीक आहे.

तर हे गाणे  प्रचंड लोकप्रिय असूनही, या गाण्यामुळे संगीत क्षेत्रात वादही निर्माण झाला. प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे, ऑलिव्हर शांती यांच्या 1998 सालच्या ‘सॅक्रल निर्वाणा’ या रचनेपासून प्रेरित असल्याचा आरोप होता. तज्ज्ञांनी म्युझिक लूप आणि संगीतरचनेतील साम्य निदर्शनास आणून दिले, ज्यामुळे गाण्याच्या मौलिकतेबद्दल चर्चा सुरू झाली. या वादानंतरही, केकेनाच्या भावपूर्ण गायनानेच या गाण्याला एक अजरामर ओळख दिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

मोहनलाल आणि ममूटी यांच्या ‘पॅट्रियट’ची रिलीज पुढे ढकलली, आता या तारखेला होणार प्रदर्शित