विक्रांत मेस्सी हा बॉलिवूड एक लोकप्रिय अभिनेता आहे. या अभिनेत्याने सिनेमा सृष्टीमध्ये त्याच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच त्याने अनेक वेब सिरीज ही केल्या आहेत ज्या प्रचंड गाजले आहेत. आणि आज या अभिनेत्याचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तसेच चाहते ही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. या विशेष प्रसंगी, आपण त्याच्या जीवनकथेबद्दल जाणून घेऊयात.
विक्रांत मेस्सीला एकेकाळी त्याचे स्वतःचे मित्र त्याच्या गरिबीची कशी खिल्ली उडवत होते आणि त्याला कसे टाळत होते. मात्र आज, विक्रांतने स्वतःच्या बळावर स्टारडम मिळवले आहे. तो बॉलिवूडमधील एक यशस्वी नायक मानला जातो.विक्रांतचा जन्म 1987 साली आजच्याच दिवशी मुंबईत एका सामान्य कुटुंबात झाला. आणि त्याला कलेबाबत जसे कळत गेले तशी याबाबतची गोडी निर्माण झाली. आणि त्याने अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यामुळे त्याने अनेक छोटी-मोठी कामे केली आणि एका कॅफेमध्येही काम केले. पण त्याने आपल्या स्वप्नांचा कधीही त्याग केला नाही.
2007 साली, विक्रांतला पहिली संधी मिळाली आणि ‘धूम मचालो धूम’ या टीव्ही मालिकेत त्याला आमिर (aamir)हसनच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले. येथूनच विक्रांतच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. या मालिकेनंतर, विक्रांतने ‘धर्मवीर’ नावाच्या आणखी एका टीव्ही मालिकेत आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. टेलिव्हिजनमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर, विक्रांतला चित्रपटसृष्टीत आपले स्थान सापडले. 2013 मध्ये रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लुटेरा’ या चित्रपटात एक दमदार भूमिका साकारली होती. तर नंतर अनेक चित्रपटात तो काम करु लागला. आणि आज तो उत्तम अभिनेता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा









