[rank_math_breadcrumb]

दोन वेळा हार्ट ट्रान्सप्लांट झालं, सलमान खानची मिळाली होती साथ, महिलेची भावूक प्रतिक्रिया

सलमान खान हा एक बॉलिवूडचा लोकप्रिय सुपरस्टार आहे. या अभिनेताने सिनेमा सृष्टीमध्ये त्याच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच त्याने अनेक शो ही होस्ट केल्या आहेत ज्या प्रचंड गाजले आहेत. तसेच तो अनेकदा वादामुळेही चर्चेत राहिला आहे. पण एक त्याच्याकडे अभिनयासोबत आहे ते म्हणजे मानवतावाद. तसेच ही बाब  प्रसिद्धीपासून दूर राहून लोकांना मदत करण्यावर विश्वास ठेवते. तर त्याने 2007 मध्ये ‘बीइंग ह्युमन फाउंडेशन’ ची स्थापना केली. आणि या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात हजारो लोकांना मदत करतो.

काहि दिवसांनपुर्वीच कर्नाटकातील रीना राजूने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, तिच्या दोन हार्ट ट्रान्सप्लांटच्या कठीण काळात सलमान खानने तिला कसा आधार दिला. कर्नाटकात राहणाऱ्या रीना राजूवर एक नाही तर दोन हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाल्या. एका पॉडकास्टवर आरजेशी बोलताना रीना भावुक झाली. तिने सांगितले की, तिच्या पहिल्या प्रत्यारोपणापूर्वी तिच्याकडे सलमान खानचा नंबर होता. तिने त्याला मेसेज करून सांगितले की ती हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करून घेणार आहे. त्यावेळी सलमान ऑस्ट्रेलियामध्ये शूटिंग करत होता, पण त्याने केवळ तिच्या मेसेजला प्रतिसादच दिला नाही, तर प्रत्यारोपणाच्या रात्री तिला फोनही केला. रीनाच्या म्हणण्यानुसार, सलमानने तिच्या कुटुंबाशी सुमारे दोन तास संवाद साधला आणि तिला ही मोठी शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केले.

रीनाने सांगितले की सलमान (salman)खानचे व्यक्तिमत्व उदारतेने भरलेले आहे. तिला आठवले की रीनाने खूप पूर्वी पांढऱ्या रंगाच्या बीइंग ह्युमन सायकलची इच्छा व्यक्त केली होती, जी त्याने तिला भेट दिली होती. आजही, जेव्हा रीनाला तिच्या प्रत्यारोपणानंतर आरोग्याच्या समस्या येतात, तेव्हा ती सलमानला मेसेज करते आणि तो अभिनेता नेहमीच आपुलकीने प्रतिसाद देतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘सैयारा’नंतर अहान पांडे या चित्रपटात दिसणार; फर्स्ट लूक समोर आला