गौरव खन्ना हा एक लोकप्रिय टेलीव्हिजन स्टार आहे. तसेच बिग बॉस 19 चा विजेता देखील आहे. त्याने आज पर्यत अनेक टेलीव्हिजन शो केले आहेत. आणि त्याच्या उत्तम अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तर त्याची आकांक्षा चमोला, सोशल मीडियावर वारंवार ट्रोलिंगचे लक्ष्य बनत असते, अलीकडेच, आपल्या फोटो आणि डान्स मूव्ह्समुळे चर्चेत असलेल्या आकांक्षाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर यामध्ये ‘शिवोहम्’ गाण्यावर तिने डान्स केला होता मात्र तिने हा डान्स करताना हावभाव वेगळे केले. त्यामुळे नेटकरी आता संताप व्यक्त करत आहेत.
एका पापाराझीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, आकांक्षा एका कार्यक्रमात बसलेली दिसत आहे आणि तिच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे पाहून विचित्र हावभाव करते. हे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तर या प्रकारावर लोक ‘शिवोहम्’ गाण्याचा अपमान आहे म्हणून असा त्याचा अर्थ लावत आहेत. यामुळे सोशल मीडियावर संताप आणि शिवीगाळ सुरू होते. हा व्हिडिओ व्हायरल होतो आणि आकांक्षा पुन्हा एकदा ट्रोलिंगचे लक्ष्य बनते.
मात्र, आकांक्षा ट्रोलिंगचे लक्ष्य बनण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी आकांक्षा खन्नाच्या वाढदिवसानिमित्तच्या डान्स परफॉर्मन्सने सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे तिला यापूर्वी ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आकांक्षा हि एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे आणि तिने अनेक मालिका केले आहेत, तसेच तिचा पति गौरव (gaurav)हा पण एक लोकप्रिय टेलीव्हिजन स्टार असल्याने हे जोडपे नेहमीच चर्चेत असते. तर आकांक्षाचे सोशल मीडियावर 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
परिणीती चोप्राने सुरु केला नवीन टॉक शो; पती राघव चड्ढाने दिल्या शुभेच्छा


