Tuesday, April 7, 2026
Home टेलिव्हिजन तारक मेहता…, फेम अभिनेत्री दिशा वकाणीचे वडील भीम वकाणी यांचे निधन..!

तारक मेहता…, फेम अभिनेत्री दिशा वकाणीचे वडील भीम वकाणी यांचे निधन..!

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हि टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. तर यातील दया या पात्राची भुमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी आहे. तर तिच्या कुटुंबाकडून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. शा वकानीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांचे अहमदाबादमध्ये निधन झाले आहे. तर ते खुप दिवसापासुन आजारी होते. भीम वकानी हे एक उत्कृष्ट अभिनेते होते. तर त्याच्या मार्गदर्शानाखालीच त्याची मुलगी दिशा आणि सुंदरलालची भूमिका साकारणारा मुलगा मयूर वकानी या दोघाना त्यांनी घडवले होते.

वकानी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे मोदी म्हणाले की, त्यांना आज सकाळी कुटुंबाकडून या कधीही भरून न येणाऱ्या नुकसानीबद्दल समजले. ते भावूक झाले आणि म्हणाले, भीम वकानी स्वतः एक निष्णात चित्रकार, अभिनेते आणि दिग्दर्शक होते. दयाबेनच्या भूमिकेमुळे दिशा वकानीला प्रसिद्धी मिळवून देण्यात तिच्या वडिलांची मोठी भूमिका होती.” “त्यांनी दिशाचे करिअर घडवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. असित मोदी यांनी पुढे सांगितले की, भीम वकानी यांच्यासोबतचे त्यांचे नाते व्यावसायिकतेपेक्षा अधिक कौटुंबिक होते.

त्यांचे मूळ गाव अहमदाबाद येथे भीम (bhim)वकानी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच, अनेक टीव्ही कलाकार, चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर असलेल्या दिशा वकानी यांना एक मोठे वैयक्तिक दुःख सहन करावे लागत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘जय श्री कृष्णा’ या मालिकेतील गोलमटोल कान्हा आठवतोय? ३ वर्षांच्या या चाइल्ड आर्टिस्टने जिंकली होती लाखोंची मने

हे देखील वाचा