आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर ‘आणि धुरंधर २’चित्रपट हे दोन्ही चित्रपट गाजले आहे. सध्या धुरंधर 2’ या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ चालू आहे. आणि या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. त्यामुळेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे आणि दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे. पण अजून एक कारणामुळे धुरंधर हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट निर्माते संतोष कुमार यांनी आदित्य धर वर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाची नक्कल केल्याचा आरोप केला होता. तर आता मुंबई उच्च न्यायालयाने आदित्य धरला अंतरिम दिलासा देत म्हणले आहे की, ‘धुरंधर’बद्दल बदनामीकारक टिप्पणी करण्यापासून रोखले आहे. तर याबाबतची न्यायालयाने आता 16 एप्रिल रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी चित्रपट निर्माते संतोष कुमार यांना फटकारत आणि चित्रपटाबद्दल बदनामीकारक टिप्पणी करण्यापासून रोखले आहे. तर आता आदित्य धर (dahr)यांना तात्पुरता दिलासा दिला. या प्रकरणाची सुनावणी एकल न्यायाधीश, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी केली आहे. ज्यांनी धर यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांनी केलेले संक्षिप्त युक्तिवाद विचारात घेतले. तर हा युक्तिवाद आता थांबवण्यात आला असुन या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 एप्रिल रोजी होणार आहे.
धुरंधर 2 प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा संतोष कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य धर यांच्यावर चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप केला. आणि तेव्हा पासुन हा वाद सुरु झाला आहे. धर यांच्या म्हणण्यानुसार, कुमार यांनी त्यांच्यावर पटकथेची नक्कल केल्याचा आरोप केला होता. तर या प्रकरणात आता पुढे काय हे पाहणे गरजेचे आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘कॉकटेल २’ मधील ‘जब तलक’ या गाण्याचा फर्स्ट लूक समोर; परंतु चाहते निराश


