Friday, April 10, 2026
Home बॉलीवूड ‘धुरंधर 2’ला प्रोपेगेंडा म्हणणाऱ्यांवर भडकले संदीप रेड्डी वांगा, ॲनिमलचे दिग्दर्शकांनी आदित्य धर यांचीही केली स्तुती

‘धुरंधर 2’ला प्रोपेगेंडा म्हणणाऱ्यांवर भडकले संदीप रेड्डी वांगा, ॲनिमलचे दिग्दर्शकांनी आदित्य धर यांचीही केली स्तुती

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा चित्रपट प्रचंड गाजला. तर धुरंदर 2 हा चित्रपट सध्या प्रदर्शित  झाला असून तर सर्वत्र या चित्रपटाबाबतच चर्चा सुरू आहे, रणवीर सिंग अभिनित या चित्रपटात ॲक्शन, थ्रिलर कथा या सर्वांमुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत. तर या चित्रपटाबाबत अनेक दिग्गज लोकांनी मत मांडले. काहींनी या चित्रपटाला शुभेच्छा आणि कौतुक केले. तर काहींनी टीका केली आहे. तर अशीच एक गोष्ट म्हणजे आता, ‘ॲनिमल’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या संदीप रेड्डी वांगा यांनी, ‘धुरंधर 2’ ला प्रचारकी चित्रपट म्हणणाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच या चित्रटाचे कौतुक केले आहे.

संदीप (sandeep)रेड्डी वांगा यांनी ‘एक्स’वर ‘धुरंधर पार्ट 2’ बद्दल पोस्ट करताना लिहिले, “लेखक आणि कलाकारांनी गैरवर्तनाच्या आधारावर आपले करिअर घडवले. पण तेच आता, तेच लोक ‘धुरंधर’ची खिल्ली उडवत आहेत. जर तुमची पहिली प्रतिक्रिया खिल्ली उडवण्याची असेल, तर तुम्ही स्वतःला उदारमतवादी म्हणवू शकत नाही.  मुद्द्यावर येतो… मला आदित्य धर आणि रणवीर सिंग यांना सांगायचं आहे की, हा नकारात्मक दृष्टिकोन इतक्यात नाहीसा होणार नाही. मूठभर लाल मिरच्यांनी काम होणार नाही, संपूर्ण शेतच जाळावं लागेल. काल रात्री ‘धुरंधर: द रिव्हेंज’ पाहिला, एक अप्रतिम चित्रपट आहे.

‘धुरंधर 2’ ने फक्त 22 दिवसांत जगभरात 1653 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘धुरंधर 2 हा चित्रपट 18 मार्च रोजी पेड रिव्हसाठी रिलीज झाला होता तर 19 मार्च रोजी हा चित्रपट सर्वत्र पाहण्यासाठी रीलीज झाला होता. तर हा चित्रपट सध्या बाॅक्स आँफिसवर धुमाकुळ घालत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

टिआरपी वर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा दबदबा, तर ‘अनुपमा’वर नव्या शोचा प्रभाव

 

हे देखील वाचा