Monday, April 13, 2026
Home बॉलीवूड ‘डकैत’च्या कमाईत मोठी घसरण की वाढ, चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन घ्या जाणून

‘डकैत’च्या कमाईत मोठी घसरण की वाढ, चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन घ्या जाणून

मृणाल ठाकूर हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर तिच्या नवनवीन चित्रपटासाठी नेहमीच चर्चेत असेत तर तिचा ‘डकैत’ हा चित्रपट 10 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात आदिवी शेष आणि मृणाल ठाकूर हे दोघे प्रमुख भुमिकेत चित्रपट प्रदर्शित होऊन आता तीन दिवस झाले आहे. आणि प्रेक्षकांनी त्या चित्रपटाच्या कथेचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तसेच आतापर्यंत बॉक्स ऑफिस झाली हे पाहू

सॅकनिल्कच्या ताज्या माहितीनुसार, ‘डकैत’ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 6.40 कोटींची कमाई केली आहे. पहिला रविवार असूनही चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली नाही. चित्रपटाने शुक्रवारी 6.55 कोटींची कमाई केली आणि दुसऱ्या दिवशी 6.85 कोटी कमावले. यामुळे चित्रपटाचे एकूण भारतीय ग्रॉस कलेक्शन 23.41 कोटी आणि एकूण भारतीय नेट कलेक्शन 19.80 कोटी झाले आहे.

या चित्रपटात आदिवी शेष, मृणाल ठाकूर, प्रकाश राज, अनुराग कश्यप, हे कलाकार आहेत. ‘डकैत‘ (Dacoit)या चित्रपटाचे दिग्दर्शक शेनिल देव हे आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती सुप्रिया यारलागड्डा, सुनील नारंग यांनी केली आहे. तर या चित्रपटीची कथा ही कथा दोन जुन्या प्रियकरांभोवती फिरते. आणि ज्यांना एकापाठोपाठ एक दरोडे टाकण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलते. आणि हा चित्रपट अन्नपूर्णा स्टुडिओने सादर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा

राजकीय सन्मानाने होणार आशा भोसले यांचा अंत्यसंस्कार, आशाजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहोचले सेलिब्रिटी

हे देखील वाचा