[rank_math_breadcrumb]

शक्ती मोहनने राघव जुयालसोबतच्या चर्चांवर तोडले मौन, रोमँटिक चर्चांवर दिले उत्तर

शक्ती मोहन हि एक लोकप्रिय डान्सर आहे. तसेच नृत्यदिग्दर्शिका आहे. आणि ती ‘डान्स इंडिया डान्स २’ या रिॲलिटी शोची विजेती देखील आहे. डान्स इंडिया डान्स या शोची ती परीक्षक आणि कॅप्टन होती. तर या शो जास्त लोकप्रिय झाली.  या शो दरम्यान शक्ती मोहन आणि राघव जुयाल यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अलीकडेच, शक्तीने राघवसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.

‘डान्स प्लस’ या डान्स रिॲलिटी शोमधील शक्ती मोहन आणि राघव जुयाल यांचे रोमँटिक क्षण अनेकदा चर्चेत राहिले. एका मुलाखतीत शक्ती मोहनने राघव जुयालसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. शक्ती आणि राघव अनेक डान्स रिॲलिटी शोमध्ये एकत्र दिसले, जिथे शक्तीने परीक्षक म्हणून आणि राघवने सूत्रसंचालक म्हणून काम केले आहे. शक्तीने राघवसोबतच्या तिच्या घनिष्ठ नात्याबद्दल सांगितले.  तर ती त्याला तिच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणुन सांगितले. पण ते ‘डान्स प्लस’ या टीव्ही रिॲलिटी शोच्या आधी, ते फक्त सामान्य मित्र होते. मात्र, शोच्या निर्मात्यांनी लवकरच त्यांच्या नात्याला एक रोमँटिक वळण द्यायला सुरुवात केली. हे सर्व स्क्रिप्टेड होते, असे तिने सांगितले.

शक्तीने (shakti)पुढे सांगितले की, डान्स प्लस शोमध्ये राघव जुयालसोबत झालेल्या एका किसिंग मोमेंटबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, एक किसिंग मोमेंट ठरलेली होती. खरं सांगायचं तर, मला याची कल्पनाही नव्हती. मी असं काहीतरी ऐकलं होतं की, ‘जर असं झालं, तर राघव तुला किस करेल.’ मला वाटलं, का? हे असं का होत आहे? तुम्ही पाहिल असेल की मी खुप अनकम्फर्टेबल झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘धुरंधर’ची स्वस्त नक्कल केल्याबद्दल पाकिस्तानी शो ट्रोल; युझर्स म्हणाले, ‘आता तर हा शो नक्कीच १००० कोटींचा होणार…’