[rank_math_breadcrumb]

रणवीर-दिपिका दुसऱ्यांदा होणार आई बाबा, दिपिकाने शेअर केली गुडन्यूज

भारतीय बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आहे. हे दोघेहि लोकप्रिय कलाकार आहेत त्यांनी त्याच्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत. तर आता ते त्याच्या एका आनंदाची बातमीमुळे चर्चेत आहेत. रविवारी दीपिकाने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. तर ही बातमी म्हणजे दीपिका आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. आणि दीपिकाने तिची मुलगी दुआ हिच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट धरलेला एक फोटो शेअर केला. तर ही पोस्ट करताच आता सोशल मिडीयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रविवारी सकाळी, दीपिका पदुकोणने तिची मुलगी दुआ हिचा, वडील रणवीरच्या मांडीवर बसलेला आणि पांढरा बॉडीसूट घातलेला एक फोटो पोस्ट केला. मात्र, फोटोमध्ये दुआचा चेहरा दिसत नाही. दुआच्या हातात एक प्रेग्नन्सी किट आहे, ज्यामध्ये पॉझिटिव्ह टेस्ट रिझल्ट दिसत आहे. या पोस्टद्वारे रणवीर आणि दीपिकाने पुष्टी केली आहे की त्यांची मुलगी दुआला भाऊ किंवा बहीण होणार आहे. तर या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिचे आणि रणवीरचे अभिनंदन केले आहे.

2018 मध्ये दीपिका आणि रणवीरचे (ranveer)लग्न झाले. बराच काळ डेटिंग केल्यानंतर, या जोडप्याने डेस्टिनेशन वेडिंग केले आणि त्यानंतर मुंबईत एक भव्य रिसेप्शन आयोजित केले. 2024 मध्ये, या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले जिचे नाव त्यांनी दुआ ठेवले. दुआच्या जन्मापासून दीपिका मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तर या दरम्याण रणवीरने चित्रपट केले आहे. त्यातील एक धुंरधर जो की प्रंचड गाजला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अर्शद वारसी आईच्या मृत्यूसाठी स्वतःलाच मानतो जबाबदार, नेमकं काय कारण ते घ्या जाणुन