आदित्य धरचा ‘धुरंधर २‘ (Dhurandhar 2) हा चित्रपट या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झाल्यावर चर्चेचा विषय बनला. चित्रपटातील दमदार ॲक्शन दृश्ये आणि प्रभावी सेट पीसेस ही त्याची मुख्य वैशिष्ट्ये होती. चित्रपटाचे एसएफएक्स सुपरवायझर, विशाल त्यागी यांनी खुलासा केला की, चित्रपटात दाखवलेले सर्व स्फोट खरे होते. रणवीर सिंग आणि अर्जुन रामपाल यांच्यासोबत चित्रित केलेल्या क्लायमॅक्स सीनमध्ये ५०० लिटर पेट्रोल वापरण्यात आले होते.
‘हिंदी रश’शी बोलताना विशालने स्पष्ट केले की, त्याला अनेकदा छोटे स्फोट तयार करण्यास सांगितले जाते, जे नंतर CGI वापरून मोठे केले जातात. मात्र, ‘धुरंधर २’ मध्ये हा दृष्टिकोन वापरला गेला नाही.
तो म्हणाला, “आदित्य धर म्हणाला, ‘मला CGI वापरायचं नाही,’ विशेषतः स्फोटांसाठी. शेवटचा टँकर स्फोट सर्वात कठीण होता. सुरक्षेची सर्वात मोठी चिंता होती. कल्पना करा—५०० लिटर पेट्रोल! त्या स्फोटातून उडणारे सर्व तुकडे खरे होते. रणवीर स्फोटस्थळाच्या अगदी जवळून चालत होता. आगीच्या ज्वाला त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत याची मला खात्री करायची होती. आम्ही सर्व काही खूप काळजीपूर्वक केले आणि रणवीर सिंगला नेमके कुठून चालायला सुरुवात करायची हे सांगितले होते.”
विशाल म्हणाला, “प्रॉडक्शनच्या वेळी माझ्यावर खूप दबाव होता. स्फोटासाठी खऱ्या ट्रेन आणि कंटेनर वापरण्यात आले. हे एक खूप कठीण काम होते, पण आम्हाला स्वतःवर विश्वास होता. प्रॉडक्शन टीमने मला २५० लिटर तेल वापरायला सांगितले, पण मी आग्रह धरला की किमान ५०० लिटर तेल लागेल. योग्य परिणाम साधण्यासाठी, मला प्रत्येक टाकीत २५ किलो स्फोटके ठेवावी लागली.”
‘धुरंधर २’ मध्ये रणवीर सिंग एका दमदार अवतारात दिसतो, ज्यात त्याच्या जसकिरत सिंग रंगी या पात्राचा हमजा बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, त्याने जगभरात १७५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ऑस्ट्रेलियन मंत्री शाहरुख खानच्या या चित्रपटाचे फॅन; आवडत्या चित्रपटाबाबतची सांगितली गोष्ट










