Friday, May 22, 2026
Home बॉलीवूड डोळ्यांच्या त्रासामुळे अक्षय कुमारने घेतला कामातून ब्रेक; पार पडली डोळ्यांची शस्त्रक्रिया

डोळ्यांच्या त्रासामुळे अक्षय कुमारने घेतला कामातून ब्रेक; पार पडली डोळ्यांची शस्त्रक्रिया

अक्षय कुमार हा एक बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. मात्र तो आता त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. तर आता अक्षयला डोळ्यांच्या एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अथक कामाचा ताण आणि व्यस्त वेळापत्रकानंतर, हा अभिनेता आता आराम करण्यासाठी थोडा ब्रेक घेणार आहे. डोळ्यांच्या त्रासामुळे त्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

वृत्तानुसार, अक्षय (akshay)कुमारवर बुधवार, 6 मे रोजी सकाळी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ही प्रामुख्याने दृष्टी सुधारण्यासाठी केलेली एक छोटी शस्त्रक्रिया होती. एका जवळच्या सूत्राने माध्यमांना सांगितले की, अक्षयने त्याच्या आगामी चित्रपटाचे केरळ शेड्यूल यशस्वीरित्या पूर्ण केले होते, त्यानंतर त्याने या वैद्यकीय प्रक्रियेसाठी वेळ काढला. शस्त्रक्रियेनंतर, डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून तो पूर्णपणे बरा होऊन लवकरात लवकर कामावर परत येऊ शकेल.

तर त्याचा चित्रपट म्हणजे भूत बंगला. अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट केले आहे. तसेच भूत बंगला चे दिग्दर्शक प्रियदर्शन आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने या आधीही उत्तम चित्रपट दिले आहेत. तर बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम केली आहे.  हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.  तर हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. तर अक्षय कुमारचा एक आगामी चित्रपट ज्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण यात विद्या बालन आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा

35 वर्षांपूर्वी टीव्हीवर गाजलेली ही मास्टरपीस मालिका, ज्याला आहे IMDb वर 8.9 रेटिंग

हे देखील वाचा