Monday, May 11, 2026
Home साऊथ सिनेमा प्रकाश राज यांनी उपराज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली, तर विजय यांच्याबाबतची प्रतिक्रिया चर्चेत

प्रकाश राज यांनी उपराज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली, तर विजय यांच्याबाबतची प्रतिक्रिया चर्चेत

आज काल बॉलीवूड प्रमाणेच दक्षिणीत्य चित्रपट सुद्धा तितकेच जबरदस्त आणि गाजत आहेत. तसेच तेथील सुपरस्टारचे चित्रपट आणि राजकारण यांचे नाते नेहमीच घट्ट राहिले आहे. तर आता 4 मे 2026 रोजी तामिळनाडूमध्ये जे काही घडले, ते कोणत्याही चित्रपटाच्या क्लायमॅक्सपेक्षा अधिक रोमांचक आहे. थलपथी विजय, ज्यांनी काही वर्षांपूर्वीच कॅमेऱ्याला रामराम ठोकून लोकसेवेचा मार्ग निवडला होता, ते आता तामिळनाडूचे नवे ‘जनतेचे नेते’ म्हणून उदयास आले आहेत. थलपथी विजय, ज्यांनी काही वर्षांपूर्वीच कॅमेऱ्याला रामराम ठोकून लोकसेवेचा मार्ग निवडला होता, ते आता तामिळनाडूचे नवे ‘जनतेचे नेते’ म्हणून उदयास आले आहेत. या सर्व बाबीचा आता सोशल मिडीयावर धुमाकुळ आणि विजयचे कौतुक होत आहे. तर थलपथी विजयचे प्रकाश राज यांनी अनेकदा अभिनयकौशल्याची प्रशंसा केली असली तरी, सुपरस्टारच्या राजकारणातील प्रवेशावर अप्रत्यक्षपणे उपहासात्मक टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

तर दरम्यान, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी विजय आणि त्यांच्या पक्षाला, तामिळनाडू वेत्री कळघम, बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले आहे. प्रकाश राज यांनी यापूर्वी विजय यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी, त्यांनी राज्यपालांच्या अलीकडील भूमिकेचे उघडपणे समर्थन केले आहे. ‘एक्स’  यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश राज यांनी लिहिले, “राज्यपालांचे हे वर्तन घृणास्पद, घटनाबाह्य आहे. आमच्यात मतभेद असू शकतात… पण विजय यांच्याकडे जनादेश आहे. त्यांना सभागृहात आपला दावा मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे.

तर या आता घडामोडीवर केवळ स्थानिक लोकच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारही राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. प्रकाश राज यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांची एक पोस्ट पुन्हा शेअर केली, ज्यात राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप घेण्यात आला होता.

सौंदर्याने महफिल जिंकणारी ही अभिनेत्री ग्लॅमरला रामराम ठोकत बनली बौद्ध भिक्षुणी

हे देखील वाचा