Saturday, May 9, 2026
Home टेलिव्हिजन दूरदर्शनचे काही धार्मिक शो, ज्यांची लोकप्रियता आजही आहे कायम

दूरदर्शनचे काही धार्मिक शो, ज्यांची लोकप्रियता आजही आहे कायम

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. या मालिकांचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियासारखे माध्यम नव्हते. तरीही, या धार्मिक मालिकांचा प्रभाव प्रत्येक घरापर्यंत पोहोचला. त्यावेळी घरात दूरदर्शन असणे ही एक विशेष गोष्ट मानली जात असेजरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे.  असे काही धार्मिक मालिकां ज्यानी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं अश्या मालिकांबाबत आज जाणुन घेवुयात.

रामायण –  ‘रामायण’  रामानंद सागर (sagar)याची ही मालिका ज्याने भारतीय दूरदर्शनच्या इतिहासावर आपला ठसा उमटवला आहे. या शोमुळे अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांसारख्या कलाकारांना ओळख मिळाली. IMDb वर याला 9 रेटिंग आहे.

महाभारत –  ‘महाभारत’ बी.आर. चोप्रा निर्मित मालिका आहे. ही 8.9 रेटिंगसह भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. तर आजही ही मालिका लोकप्रिय आहे.

जय हनुमान – ‘जय हनुमान’ ही भगवान हनुमानाच्या जीवनावर आधारित 1997 मधील एक भारतीय टेलिव्हिजन मालिका आहे. याचे दिग्दर्शन संजय खान यांनी केले होते.

श्री कृष्ण – ‘श्री कृष्ण’ ही 1993 मध्ये प्रदर्शित झाली होती. तर हि मालिका रामानंद सागर यांनी  निर्मित आहे.  ही मालिका कृष्णाच्या जीवनातील कथांवर आधारित असुन 8.7 रेटिंग असलेली ही मालिका आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

22 वर्षापुर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही लोकांच्या आहे ओठांवर, 5 मिनिटांत सांगते प्रेमाची गोष्ट

हे देखील वाचा