अमिषा पटेल ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने आतापर्यंत अनेक चित्रपट केले आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तिचा गदर हा चित्रपट प्रचंड गाजला तसेच आजही त्या चित्रपटाला लोक दिसू शकले नाहीत. गदर मधील गाणे सुद्धा तितकेच गाजलीत. तर आता तर तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे. नुकतेच, अमिषाने एक सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने नवीन अभिनेत्री आणि बॉलिवूडच्या ‘बनावट पीआर गेम’वर टीका केली आहे.
अमिषा (amisha)पटेलने या पोस्टमध्ये अशा नवीन अभिनेत्रींवर निशाणा साधला, ज्यांना इंडस्ट्रीत येऊन फार काळ झालेला नसतानाही स्वतःला ‘सुपरस्टार’ आणि ‘नंबर 1’ म्हणवून घ्यायला आवडते. आपल्या पोस्टमध्ये अमिषाने स्पष्टपणे म्हटले आहे की, बहुतेक अभिनेत्रींनी त्यांच्या नावावर एकही मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट नसतानाही, बनावट पीआरच्या माध्यमातून हे टॅग मिळवले आहेत.
‘कहो ना प्यार ‘ आणि ‘गदर’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम करुन अमिषा पटेलने नाव मिळवले आहे. तसेच ‘गदर’ 2 हा चित्रपट गाजला. कलाकार पीआरच्या माध्यमातून नंबर 1 चा टॅग कसा मिळवत आहेत हे स्पष्ट करत, इंस्टाग्रामवर बॉलिवूडमधील सत्य उघड केले आहे. पोस्टमध्ये अमीशाने लिहिले, “स्वतःला सुपरस्टार तेव्हाच म्हणा, जेव्हा तुम्ही इतिहास घडवणारे आणि बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवणारे काहीतरी करून दाखवाल. तोपर्यंत, स्वतःला सुपरस्टार सिद्ध करण्यासाठी पीआरचे खेळ खेळणे थांबवा. माफ करा, पण हेच कटू सत्य आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
कृष्णावतारम पार्ट 1: हृदयम भावनिक कथा ठरली हिट, ओपनिंग डे ला जोरदार कमाई










