Thursday, May 14, 2026
Home वेबसिरीज सीझन 2 सह धमाकेदार पुनरागमन; रणदीप हुड्डाची सिरीज आता जियो हॉटस्टारवर रंगणार

सीझन 2 सह धमाकेदार पुनरागमन; रणदीप हुड्डाची सिरीज आता जियो हॉटस्टारवर रंगणार

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अशीच एक सिरीज म्हणजे इन्स्पेक्टर अविनाश, या सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यामधील कथाही ड्रामा, क्राईम यामुळे ही मालिका अधिक लोकप्रिय ठरली. तर आता ‘इन्स्पेक्टर अविनाश’ सीझन 2 येत आहे. रणदीप हुड्डा पोलिसांच्या रणदीप हुड्डा पोलिसांच्या भुमेकेत गुंडांना धारेवर धरताना दिसणार आहे.

‘इन्स्पेक्टर अविनाश’ या मालिकेचा दुसरा सीझन 15 मे रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. तर ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक खुप आतुर आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ट्रेलर शेअर करून याची पुष्टी केली आहे आणि नुकताच ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये म्हटले आहे, यावेळी खेळ मोठा आहे. शत्रू भयानक आहे, पण इन्स्पेक्टर अविनाश हे सर्व संपवून टाकेल. तर पहिल्या मालिकेचे भाग एकुण 8 होते पण दुसऱ्या सीझनमधील एपिसोडची संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

‘इन्स्पेक्टर अविनाश सीझन २’ या मालिकेत पोलीस अधिकाऱ्याच्या वाटेला आलेल्या आव्हानात्मक लढाईची कहाणी आहे. आणि ही कहाणी मध्ये अनेक वळण आहेत. आणि हे आव्हानात्मक लढाई कशी पार केली जाते हे पाहण्यासारखे आहे. या सीरीज मध्ये रणदीप (randeep)हुड्डा यांच्या व्यतिरिक्त, ‘इन्स्पेक्टर अविनाश सीझन 2’ मध्ये उर्वशी रौतेला, अमित सियाल, अभिमन्यू सिंग, रजनीश दुग्गल, शालिन भानोट आणि फ्रेडी दारूवाला हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘कृष्णावतारम’ची राधा कोण? हि अभिनेत्री आहे डान्समध्येही पारंगत, तर साऊथच्या दिग्गज कलाकारांसोबत केले आहे काम

हे देखील वाचा