Wednesday, May 20, 2026
Home बॉलीवूड शाहिद कपूर आणि क्रिती सॅनॉनच्या रोमँटिक अंदाजाने ‘कॉकटेल 2’चं नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल

शाहिद कपूर आणि क्रिती सॅनॉनच्या रोमँटिक अंदाजाने ‘कॉकटेल 2’चं नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल

कॉकटेल हा चित्रपट खुप गाजला आणि आता याचा 2रा पार्ट येत आहे. ‘कॉकटेल 2’ मधील गाणे नुकतेच रीलीज झाले असुन यामध्ये मशूका या नवीन गाण्यात शाहिद कपूर आणि क्रिती सॅनॉन यांची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणे आता चांगलेच व्हायरल झाले आहे. या गाण्याला खुप व्हीज मिळाले असुन आता हे गाणे लोकप्रिय होत आहे. तर आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

कॉकटेल 2 च्या बाबत शाहिदने एका निवेदनात मशूका मध्ये एक अशी व्हायब आहे जी तुम्हाला लगेच आकर्षित करते. आणि मला आणि कृतीला हे गाणे शुट करताना खुप मज्जा आली कारण या गाण्यात जास्त गंभीरपणा नाही. ते एक मंनोरंजनात्मक गाण आहे. आणि यात खेळकरपणा दाखवायचा आहे. तर हे गाणं शुट करताना आम्हला खुप मज्जा आली. “कॉकटेल 2” 19 जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कॉकटेल 2 या चित्रपटात शाहिद (shahid) कपुर, रश्मिका मंदाना, कृती दिसणार आहे. तर या चित्रपटाच्या पहिल्या भागात दीपिका पदुकोण, सैफ अली, डायना पेंटी हे कलाकार होते. आणि चित्रपट 2012 मध्ये रीलीज झाला होता. आणि आता येवढ्या वर्षीनी याचा सिक्वेल येत आहे, आणि त्यामुळे या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘कॉकटेल 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे. तसेच पहिल्या पार्टचे ही दिग्दर्शन होमी यांनीच केले होते.

‘ड्रॅगन’ ’मधील Jr. NTRचा फर्स्ट लुक समोर, 4 मिनिटे 28 सेकंदांच्या टीझरमध्ये दिसला खतरनाक अंदाज

हे देखील वाचा