भारतीय चित्रपटसृष्टीत एक महत्त्वपूर्ण वैचारिक बदल दिसून आला आहे. भडक ग्लॅमर आणि थक्क करणाऱ्या ॲक्शन सीक्वेन्सऐवजी, प्रेक्षक अधिकाधिक अशा कथांना पसंती देत आहेत, कारण प्रेक्षकांच्या रोजच्या घडामोडी विषयी घटना त्यात कथीत असतात त्यामुळे प्रेक्षक ते कथा जास्त रिलेटेड होतात. आणि त्यामुळे अश्या चित्रपटाचे प्रेक्षक वर्गही मोठा असतो. आणि आता तर आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहेत. तर 2025 मध्ये असा एक चित्रपट आला की त्याने ott वर धुमाकुळ घातला आहे.
या चित्रपटाचे नाव आहे “इडली कडाई”. हा एक तमिळ चित्रपट आहे. याची कथा प्रेक्षकांना भावली. कारण याची कथा हि साधी आहे. तर कौटुंबिक जबाबदाऱ्या, काळाच्या ओघात नात्यांमधील चढ-उतार आणि प्रियजनांसाठी केलेले त्याग हे असे पैलू आहेत, ज्यांच्याशी प्रत्येक सामान्य माणूस स्वतःला जोडून घेऊ शकतो. जेव्हा एखादा चित्रपट सशक्त अभिनय आणि अस्सल भावना यांचा संगम साधलेला यात दाखवला आहे. त्यामुळे हा चित्रपट लोकप्रिय ठरला आहे.
हा एक तमिळ (tamil)नाट्यपट आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धनुष यांनी केवळ मुख्य भूमिकाच साकारली नाही, तर त्यांनी याची कथा लिहिली आणि उत्कृष्टपणे दिग्दर्शनही केले आहे. तर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळेस प्रेक्षकांच्या समिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या पण जेव्हा हा चित्रपट ott वर रीलीज झाला त्यावेळेस मात्र या चित्रपटाने उत्तम कमाई केली. तर या चित्रपटाबाबत एक उत्तम गोष्ट म्हणजे हा चित्रपट डिजिटल माध्यमांवर रीलीज होउन 200 दिवस पुर्ण झाले तरी हा चित्रपट टिकुन आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सस्वत चॅटर्जी गांगुलीच्या बायोपिकमध्ये होणार सामील; साकारणार क्रिकेटपटूच्या वडिलांची भूमिका










