Thursday, May 28, 2026
Home टेलिव्हिजन सुनीता आहुजाचा खुलासा; गोविंदाला इम्प्रेस करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी शिकल्या होत्या स्वयंपाक

सुनीता आहुजाचा खुलासा; गोविंदाला इम्प्रेस करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी शिकल्या होत्या स्वयंपाक

गोविंदा हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. आणि त्याने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपट दिली आहेत. तसेच त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. गोविंदाची मुलगी टीना आहुजा हि शिल्पा शेट्टीच्या ‘माँ है ना’ या शोमधील स्पर्धकांपैकी एक आहे. तर या शो मध्ये सुनीता आहुजा हि आहेत. तर या शो मध्ये सुनिताला विचारले की स्वयंपाक करायला आवडतो का असे विचारले असता, सुनीता यांनी सांगितले की, पतीला खूश करण्यासाठी तिने वयाच्या 15 व्या वर्षी स्वयंपाक करायला शिकले आहे. म्हणजेच सुनीता यांनी 15 व्या वर्षीच  स्वयंपाक शिकला होता.

सुनीता (sunita)आहुजा या शो दरम्यान पुढे म्हणाल्या कि, ‘माँ है ना’ च्या सेटवर आपल्या मुलीला स्वयंपाक करायला आवडतो का असेही विचारले. त्यावर त्या म्हणाल्या, “वेळ आल्यावर प्रत्येकजण शिकतो.” त्यांनी पुढे सांगितले की मुलांवर दबाव टाकणे योग्य नाही आणि त्यांना त्यांचे आयुष्य स्वतंत्रपणे जगू दिले पाहिजे. तर पुढे त्याच्या वैवाहिक जीवनाबाबत म्हणाल्या की माझे लग्न लवकर झाले. आणि गोविंदाला खाण्याची खुप आवड होती.

सुनीता आहुजाआहुजा आणि गोंविदाने खुप कमी वयात म्हणजे सुनीता आहुजा 15 वर्षाच्या आणि गोंविदा 21 वर्षाचा होता आणि त्यानी त्या वयात डेटींग ला सुरुवात केली आणि नंतर त्यानी लग्न केले आहे.  ‘माँ है ना’ ही सीरीज  12 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. ती केवळ ZEE5 वर स्ट्रीम केली जाईल. एपिसोड प्रदर्शित होण्याची नेमकी वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी, ZEE5 ओरिजिनल्स साधारणपणे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 12 वाजता प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

या सीरीजच्या चार हिट सीझननंतर आता येणार पाचवा भाग, तर IMDb रेटिंगही आहे जबरदस्त

हे देखील वाचा