इम्रान हाश्मी हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यत अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. तसेच त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. तर तो त्याच्या आता एक आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. तर हा चित्रपट म्हणजे ‘आवारपन 2’ आहे. तर हा चित्रपटाचे आता चित्रीकरण पूर्ण केले आहे. आवारपन हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता.
आवारपन हा चित्रपट जरी त्या वेळेस जास्त चालला नसला तरी त्याची कथा ही प्रंचड प्रेक्षकांना आवडली त्याल आता ‘आवारपन 2’ प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असून, तो 14 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर ‘आवारपन’चे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले होते. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट विशेष यशस्वी ठरला नसला तरी, बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, 18 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने केवळ 12 कोटी कमावले.
आवारपन 2 या चित्रपटातील संगीत दिग्दर्शन प्रीतमने केली आहे. सय्यद (sayyad)कादरी यांनी लिहिलेली गाणी खूप गाजली. या चित्रपटाने इम्रान हाश्मीच्या कारकिर्दीलाही मोठी झेप दिली आणि त्याला एक रोमँटिक हिरो म्हणून स्थापित केले. तसेच इम्रानच्या कारकिर्दीत या चित्रपटाचे एक विशेष स्थान आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. इम्रानसोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शबाना आझमी यांनीही कथेत एक दमदार भूमिका साकारली आहे. सलील आचार्य देखील एका सशक्त भूमिकेत दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










