राम चरण हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यत अनेक चित्रपट केले आहेत. तसेच दाक्षीणात्या चित्रपट सुष्टीतील तो लोकप्रिय सुपरस्टार आहे. तसेच तो आता एक चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. तो म्हणजे ‘पेड्डी’ हा चित्रपट. हा चित्रपट काल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये राम चरण आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका आहे. तर हा चित्रपटाची प्रेक्षक खुप दिवसापासुन वाट पाहत होते आणि आता तो काल रीलीज झाला आहे.
राम चरण (charan)आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पेड्डी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी उत्कृष्ट कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 112 कोटींची कमाई केली असून, त्याचे भारतातील कलेक्शन 84 कोटींवर पोहोचले आहे. जान्हवी कपूरने हि उत्तम काम केले आहे. त्यामुळे तिचे चाहते तिची भरपुर प्रंशसा करत आहेत.
‘पेड्डी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन बच्ची बाबू सना यानी केले असुन लेखनही केले आहे. तर या चित्रपटात वामन इराणी यांनीही एक सशक्त भूमिका साकारली आहे, ज्याची झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळाली होती. राम चरणच्या विरुद्ध मुख्य नायिका म्हणून जान्हवी कपूरलाही खूप प्रशंसा मिळाली आहे. हा चित्रपट एका पैलवानाची कथा सांगत आहे. जो आपल्या गावाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी अनेक आव्हानांवर मात करतो. तर हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू पाहण्याजोगे राहिल. तर या चित्रपटाला IMDb वर आता पर्यत 10 पैकी 6.4 रेटिंग मिळाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘कबीर सिंग’चा आयकॉनिक बाइक किसिंग सीन असा झाला होता चित्रित; पडद्यामागचं सत्य पाहून बसणार धक्का










