[rank_math_breadcrumb]

वयाच्या 19व्या वर्षी घरातून पळून जाऊन केले लग्न; आता श्रीजा कोनिडेलाने सांगितला संघर्षमय प्रवास

राम चरण हा एक दाक्षिणात्या लोकप्रिय अभिनेता आहे. त्यान आतापर्यत अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. आणि आता त्याच्या एका उत्तम चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट म्हणजे पेड्डी. या मध्ये राम चरण उत्तम कामगिरी केली आहे. तसेच हा चित्रपट देखील उत्तम गाजत आहे. आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तर याच दरम्यान त्याची बहीण आणि चिरंजीवी यांची मुलगी, श्रीजा कोनिडेला, देखील चर्चेत आली आहे. श्रीजा कोनिडेलाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

श्रीजाने सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, त्यामध्ये ती म्हणाली, मी आयुष्यात काय करावे याबाबात खुप गोंधलेले होते. विचार करत होते की हे माझ्यासोबतच का घडत आहे. मी इतकं दुःख का सहन करत आहे? पण मग मी या दुःखाच्या भावनेवर मात केली आणि मला जाणवलं की हे असंच माझ्यासोबत राहू शकत नाही, तर त्यावर मात करण्याची ताकद माझ्यात आहे.

आपल्या व्हिडिओमध्ये, श्रीजाने स्पष्ट केले आहे की तिचा वेदनादायक भूतकाळ बऱ्याच काळासाठी तिची ओळख कशी बनला होता. ती म्हणते, “माझ्या आयुष्यातील बहुतेक काळ, मी स्वतःला माझ्या वेदना, भूतकाळ आणि संघर्षांशी जोडले होते. माझ्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं, तीच माझी ओळख बनली होती. पण मग, या कार्यक्रमामुळे, मी स्वतःला पुढे जाताना पाहू लागले. हो, माझ्या वेदना माझा एक भाग आहेत, पण वेदना हाच माझ्या आयुष्याचा एकमेव भाग नाही.” एक व्यक्ती म्हणून, माझ्या व्यक्तिमत्त्वाला यापेक्षा खूप अधिक खोली आहे, आणि त्या पैलूंचा शोध घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.” तर श्रीजाने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी, तिचा 22 वर्षीय प्रियकर शिरीष (shirish)भारद्वाज याच्याशी पळून जाऊन लग्न केले. मात्र ते नाते काही टिकले नाही. आणि तिने काही काळानंतर तिने लग्न केले. मात्र हे 2023 मध्येच संपले आणि या 2024 मध्ये शिरीष यांचे प्रकृतीच्या समस्यांमुळे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

OTT प्रेक्षकांची पसंती ठरला 2025 चा कोर्टरूम ड्रामा; जिओ हॉटस्टारवर ‘धुरंधर 2’लाही टाकले मागे