Saturday, August 1, 2026
Home बॉलीवूड अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या, नालासोपाऱ्यात राहत्या घरी घेतला गळफास

अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या, नालासोपाऱ्यात राहत्या घरी घेतला गळफास

अभिनेत्री संचिता उगले ही एक उत्तम अभिनेत्री होती. आणि आता तिच्याबाबत एक टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. संचिता उगले हिने वयाच्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. तर आता मिळालेल्या वृत्तानुसार, तिने आत्महत्या केली आहे. ह्या घटनेमुळे आता सोशल मिडीयावर खळबळ उडाली आहे. 

अभिनेत्री संचिता (sanchita)उगले हिने राहत्या घरी गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी 6:30 ते 7:30 च्या दरम्यान, घडल्याची माहिती आहे. अभिनेत्रीने नेमकी आत्महत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तिच्या कुटुंबाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आपल्या आई- वडील आणि बहिणीसोबत नालासोपारा येथे राहत होते. हि घटना घडली तेव्हा अभिनेत्री घरी एकटीच होती. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

संचिता उगले हिने आता पर्यत अनेक मालिका चित्रपट केले आहेत. तिने टेलिव्हिजन जगतात काम करण्याव्यतिरिक्त, अभिनेत्रीनं सिनेमा आणि स्ट्रीमिंग प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. विशेष म्हणजे तिनं विकी कौशलच्या ‘छावा’ या ऐतिहासिक सिनेमात महाराणी ‘तारा राणी’ यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीनं मनोज बाजपेयी यांच्या ‘सायलेन्स 2: द नाईट आऊल बार शूटआऊट’ या सिनेमातही काम केलं. अभिनेत्री सोशल मीडियातही सक्रिय होती. संचिताचा चाहतावर्ग खूप मोठा होता. दरम्यान, अभिनेत्रीनं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा

रश्मिका मंदानाने विजयच्या कपाळावरील घाम पुसला; कॅमेऱ्यात कैद झाला प्रेमळ क्षण

 

 

हे देखील वाचा