[rank_math_breadcrumb]

9 वर्षांच्या तैमूरने धर्माबद्दल केलेल्या विधानाने जिंकली मने, सैफ म्हणाला – देव एकच आहे

बॉलिवूड मधील नावाजलेलं जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेते सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे दोघेहि उत्तम कलाकार आहे. तसेच ते एक उत्तम पालक सुध्दा आहेत. यांना दोन मुले आहेत. ती नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या मुलांचे नाव तैमूर आणि जहांगीर  आहे, तर त्यांच्या संगोपनामुळेही ते चर्चेत असतात. हे दोन्ही कलाकार आपल्या मुलांबद्दल, मग ते त्यांचे संगोपन असो किंवा त्यांच्या आवडीनिवडी, मनमोकळेपणाने बोलतात. अलीकडेच, सैफने खुलासा केला की तो आपल्या मुलांना सर्वसमावेशक दृष्टिकोनातून कसे वाढवत आहे.  त्याने धर्म आणि श्रद्धा यांचा त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलांसाठी काय अर्थ आहे हे स्पष्ट केले. सैफ म्हणाला की, तो आपल्या मुलांना नेहमी हेच शिकवतो की देव एकच आहे, फक्त त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

लंडनमध्ये झालेल्या ‘वी विमेन’ कार्यक्रमात, सैफ अली खानने त्याचे मुलगे तैमूर आणि जहांगीर यांच्यासोबत धर्माबद्दल झालेल्या संभाषणांवर चर्चा केली. सैफ म्हणाला, “हा एक असा विषय आहे ज्यावर मला माझ्या मुलांशी बोलायला खूप आवडते. मी स्वतः फार धार्मिक व्यक्ती नाही. माझ्या आई शर्मिला टागोर यांनी मला जे शिकवले, तेच मी माझ्या मुलांना शिकवले आहे. देव एकच आहे आणि त्याला अनेक नावे आहेत.

सैफने त्याचा मोठा मुलगा तैमूरसोबत नुकत्याच झालेल्या संभाषणातील एक मनोरंजक किस्सा सांगितला. त्याने तैमूरला विचारले होते की धर्म आणि परंपरा यात काय फरक आहे. नऊ वर्षांच्या तैमूर उत्तर देत म्हणाला  “धर्मात आम्ही प्रार्थना करतो, पण परंपरेत आम्ही प्रार्थना करत नाही.” सैफ हसला आणि म्हणाला की हे खूप समंजस उत्तर आहे. आणि तो म्हणाला की, आमचा दृष्टिकोन धार्मिकतेपेक्षा अधिक आध्यात्मिक आहे.” कामाच्या बाबतीत पाहिले तर सध्या करिनाचा(karina) कोणता चित्रपट येत नसला तरी ती सोशल मिडियावर सक्रिय असते. आणि अभिनेते सैफ अली खान सध्या एक चित्रपट येणार आहे. तो म्हणजे हैवान, या चित्रपटाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा

‘वेलकम टू द जंगल’चा बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ, चित्रपटाने 3 दिवसांत जगभरात 93 कोटींची केली कमाई