सामंथा रुथ प्रभू अभिनीत ‘मा इंटी बंगारम’ हा चित्रपट काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला आहे. तसेच हा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. हा तेलुगू चित्रपटसृष्टीसाठीतला उत्तम चित्रपट ठरला आहे. या आधी अनुष्का शेट्टीचा 2009 सालचा नायिकाप्रधान चित्रपट ‘अरुंधती’ हा तेलुगू चित्रपटसृष्टीसाठी एक मानदंड ठरला होता. तर आता सामंथा रुथ प्रभू ही एक उत्तम अभिनेत्री आहे. आणि तिने अनेक चित्रपटामधुन तिचे स्थान निर्माण केले आहे. तसेच आता तिचा ‘मा इंटी बंगारम’ने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
मा इंटी बंगारम हा चित्रपट 19 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जगभरात 83 कोटींहून अधिक आणि भारतात 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे तो तेलुगू चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा नायिकाप्रधान चित्रपट ठरला आहे. हा विक्रम या आधी ‘अरुंधती’ या चित्रपटाने केला होता. ज्यात अनुष्का (anushka) शेट्टी आणि सोनू सूद यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळी, चित्रपटाने जगभरात 70 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता, ‘मा इंटी बंगारम’ने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे
‘मा इंटी बंगारम’ हा एक तेलुगु चित्रपट आहे. आणि हा चित्रपट तेलुगू सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर दक्षिण भारतीय सिनेमातील सर्वाधिक कमाई पाहिले तर लोका: चॅप्टर 1 – चंद्रा हा चित्रपट आहे. या चित्रपटात कल्याणी प्रियदर्शन आणि नसलीन यांची प्रमुख भूमिका होत्या. तर दुल्कर सलमान निर्मित या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
हेही वाचा
श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ चित्रपट वादात सापडला, राष्ट्रवादी काँग्रेसने शीर्षक बदलण्याची केली मागणी









