रजनीकांत यांचा ‘जेलर 2’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक व्हिडिओ आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तसेच या मध्ये सुपरस्टारची एक उत्तम झलक दाखवण्यात आली आहे. वृत्तानुसार, हृतिक रोशन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’चा सिक्वेल आहे. पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. नेल्सन मंडेला दिग्दर्शित आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांचे संगीत असलेला ‘जेलर 2’ 15 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होईल.
या चित्रपटाच्या अनेक कलाकारांच्या झलक दिसली आहे. तर या चित्रपटात मोहनलाल, शिव राजकुमार, विजय (vijay) सेतुपती, मिथुन चक्रवर्ती, एस. जे. सूर्या, रम्या कृष्णन, विद्या बालन आणि योगी बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘जेलर 2’ चित्रपटाचे दिग्दर्शिन नेल्सन दिलीपकुमार यांना केले आहे. तर या सिक्वेलमध्ये रजनीकांत ‘टायगर’ मुथुवेल पांडियन या आपल्या प्रतिष्ठित भूमिकेत परतणार आहेत. काही दिवसांपूर्वी, सिक्वेलबद्दल माहिती देताना रजनीकांत यांनी खुलासा केला की ‘जेलर 2’ चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आणि निर्मिती टिम लवकरच या चित्रपटाची तारीख जाहिर करतील.
‘जेलर’ 2023 मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटाने जगभरात 650 कोटींहून अधिक कमाई केली. ‘2.0’ नंतर 600 कोटींचा टप्पा ओलांडणारा हा दुसरा सर्वात जलद कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला. तर आता जेलर 2 प्रेक्षकांच्या पंसतीस उतरतो का आणि कीती कमाई करेल या कडे सर्वाचे लक्ष लागुन राहीले आहे.
हेही वाचा
थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ; ‘Obsession’ चा सायकोलॉजिकल हॉरर पुन्हा करतोय थरकाप










