नेटफ्लिक्स वर एक सीरीज येत आहे. त्याच नाव आहे, ‘मुसाफिर कॅफे’ या सीरीजच्या निर्मात्यांनी मंगळवारी तिचा ट्रेलर रीलीज केला आहे. ही सीरीज एक प्रेम कथा दाखवते. या सिरीज मध्ये विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिरीज मध्ये प्रेम, विरह, स्वताचा शोध घेणारी कथा आहे. आणि या आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटतात आणि आपल्यात तसा बदल होतो. तसेच प्रेम आयुष्यात फक्त एकदाच करणे आवश्यक आहे का.. हा प्रवास यात दाखवला आहे.
‘मुसाफिर कॅफे’ या रिलीज झालेल्या ट्रेलरची सुरुवात एका गहन आणि विचार करायला आणि विचारप्रवर्तक संवादाने होते, “आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रेमात तुम्ही पडू शकत नाही, असे कुठे लिहिले आहे?” त्यानंतर या मध्ये तीन व्यक्तीचा प्रवास दाखवला आहे. ज्यात प्रेम, करिअरमधील महत्त्वाकांक्षा, विरह या प्रवासातुन मार्ग कसा काढतात, नात्यातील चढउतार हे दाखवले आहे.
हि सिरीज एका अत्यंत लोकप्रिय हिंदी कादंबरी ‘मुसाफिर कॅफे’ यावर आधारीत आहे. तर या कांदबरीचे लेखन दिव्या प्रकाश दुबे केले आहे. ही कथा चंद्र मोहन शर्मा (विक्रांत मेस्सी) याच्याभोवती फिरते, ज्याचे स्थिर आणि स्थायिक आयुष्य सुधाला (वेदिका पिंटो) भेटल्यावर पूर्णपणे बदलून जाते. आयुष्यातील येणारे चढउतार याची कथा आहे.
‘मुसाफिर कॅफे’ ही एक सुंदर, आणि निरागस रोमँटिक ड्रामा म्हणून ओळखली जाते. याचे लेखन आणि निर्मिती शरण्या राजगोपाल यांनी केली असून दिग्दर्शन रुचिर अरुण (arun)यांनी केले आहे. ज्याना प्रेमकथा पाहायला आवडतात त्यांनी ही मालीका नक्की पाहावी, आणि ही मालिका 24 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा
रश्मी देसाई या शो मधून करणार कमबॅक; तर नव्या प्रोमोतील बालकलाकार ठरतीय चर्चेचा विषय










