[rank_math_breadcrumb]

‘धमाल 4’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, वर्ल्डवाइड कमाई 115 गेली कोटींपार

अजय देवगण हा एक लोकप्रिय कलाकार आहे. त्याने आतापर्यत अनेक चित्रपट केले आहेत. आणि त्याच्या नुकत्याच रीलीज झालेल्या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘धमाल 4’, याने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी, मंगळवारी, चित्रपटाने सोमवारपेक्षाही चांगली कमाई केली.  कमी तिकीट दरांमुळे चित्रपटाला फायदा झाला आहे. त्यामुळे चित्रपट गृहामध्ये प्रंचड गर्दिही पाहायला मिळाली आहे.

‘धमाल 4’ हा एक विनोदी शैलीचा चित्रपट आहे. हा चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट येत्या एका दिवसात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटीचा टप्पा पार करेल. चित्रपटाची एकूण भारतीय कमाई अंदाजे 99.44 कोटी झाली आहे. तर या चित्रपटाने मंगळवारी 9.50 कोटी निव्वळ कमाई केली आहे. या चित्रपटाने मंगळवारी परदेशी बाजारपेठेत 1.50 कोटी कमावले, ज्यामुळे त्याची एकूण परदेशी कमाई 16 कोटी झाली आहे. ‘धमाल 4’ ची जगभरातील एकूण कमाई आता 115.44 कोटीवर पोहचली आहे.

‘धमाल 4’ हा चित्रपट इंद्र कुमार दिग्दर्शित आहे. तर यात अनेक दिग्गज कलाकार आहेत. अजय देवगण, रितेश (ritesh)देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटाला प्रेक्षकांडुन संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. जर तुम्हाला काॅमेडी चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही नक्की पहा, तर काही प्रेक्षकाच्या मते कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट वाटला. तसेच चित्रपट हास्याने भरलेला आहे.

हेही वाचा

‘मुसाफिर कॅफे’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; हा अभिनेता दिसणार नव्या रोमँटिक अंदाजात