Thursday, July 16, 2026
Home बॉलीवूड ‘हैवान’चा फर्स्ट लूक आउट, अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या खतरनाक लुकची होतीय चर्चा

‘हैवान’चा फर्स्ट लूक आउट, अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या खतरनाक लुकची होतीय चर्चा

अक्षय कुमारचा वेलकम 2 हा चित्रपट काहीच दिवसांपुर्वी रीलीज झाला होता. त्या चित्रपटाने प्रेक्षकांना प्रंचड हसवले मात्र आता अक्षय कुमारचा त्याच्या आगामी चित्रपटात थरारक रुप पाहायला मिळणार आहे. यात अक्षय सायकॉ-थ्रिलरने सर्वाना घाबरवण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच यात सैफ अली खान असणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार 17 वर्षांनंतर सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर आता हे दोघेही ‘हैवान’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तयार आहेत.

प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट असुन या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रीलीज झाले आहे. यात अक्षय कुमार आणि सैफ अली खान हे दोघाचा ही खतरनाक लुक दिसत आहे. तर या पोस्टर सोबत निर्मात्यांनी तारीखही जाहीर केली आहे. तर हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच मंगळवारी, निर्मात्यांनी ‘पुरे झाले हसणे, आता उद्यापासून क्रूरता सुरू होईल’ अशी पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे चाहत्याची उत्सुकता वाढली होती. तर आता ‘हैवान’मधील अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचे नवीन कॅरेक्टर पोस्टर शेअर करण्यात आले होते.

आज अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर ‘हैवान’चे नवीन पोस्टर शेअर केले आणि लिहिले, “एकजण सर्व काही पाहतो, दुसऱ्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही. क्रूरता थांबणार नाही! हैवान 11 सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये येत आहे. अश्या कॅप्शनसह त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

हैवान या चित्रपटात अक्षय कुमार (kumar)खलनायकाची भूमिका साकारकार आहे तर सैफ अली खान एका अंध लिफ्टमनची भूमिका साकारत आहे. आणि या चित्रपटात अनेक उत्तम कलाकांर आसणार आहेत. अक्षय आणि सैफसोबत श्रिया पिलगावकर, सैयामी खेर, राजपाल यादव आणि शरीब हाश्मी याच्यांही यामध्ये प्रमुख भुमिका पाहयला मिळणार आहे.

‘धमाल 4’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, वर्ल्डवाइड कमाई 115 गेली कोटींपार

हे देखील वाचा