ममूटी यांना ‘ब्रह्मायुगम’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच मिळाला आहे. त्यामुळे साउथ सुपरस्टार ममूटी,धनुष,दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी,संपादक आर. कलाइवनन यांच्यासोबत त्यांच्या आगामी ‘ओम’ चित्रपटाच्या सेटवर राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद साजरा केला आहे. आणि यांचा फोटो आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तर धनुषने पण 72 व्या राष्ट्रिय चित्रपट पुरस्कार सोळ्यात 2 पुरस्कार जिंकले आहेत. एक त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणातील ‘रायन’साठी, ज्याला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, आणि दुसरा ‘कॅप्टन मिलर’मधील अभिनयासाठी, त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे.
तर या पुरस्काराचा आंनद साजरा करण्यासाठी ममूटी हे ओमच्या सेटवर केक कापताना दिसले आणि त्यांचे फोटो आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या चाहत्यांनी अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन केले आहे. तर ममुटी यांनी फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिले, “धनुष, राजकुमार पेरियासामी आणि आर. कलाइवनन यांच्यासोबत ‘ओम’च्या सेटवर आमच्या राष्ट्रीय पुरस्कार विजयाचा एक छोटासा सोहळा. सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहे.
ममूटी आणि धनुष (dhanush)यांच्या व्यतिरिक्त, राजकुमार पेरियासामी यांना ‘अमरन’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला, तर आर. कलाइवनन यांनी त्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संपादन श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.
ममूटी कामाच्या आघाडीवर पाहायचे झाल्यास “ओम: चॅप्टर 1 उधिरम – द ब्लड वूड” हा एक तमिळ चित्रपट काहीच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येईल, तर यात ममूटी सोबत धनुष, साई पल्लवी आणि श्रीलीला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर याचे दिग्दर्शन राजकुमार हे करत आहेत.
हेही वाचा
अर्जुन कपूर साहिबा बालीला डेट करत आहे का? व्हायरल फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण










