‘आवारपन 2’ चित्रपटातील नुकतच ‘ये आवारपन’ हे शीर्षक गीत प्रदर्शित झालं आहे. आणि गाणं गायक अरिजित सिंग याने गायले आहे ? आणि तो पार्श्वगायनातून घेतलेली निवृत्ती मागे घेतली असून तो बॉलिवूड संगीतात परतत असल्याच्या अफवा ऑनलाइन पसरल्या आहेत. अनेकांना वाटत आहे. तो या चित्रपटाच्या गाण्यामुळे परतला आहे. मात्र या सर्वबाबींवर आता त्याच्या टिमने स्पटीकरण दिले आहे.
तो परत विचार बदलुन या क्षेत्रात येणार आहे, असे अनेकांना वाटत आहे. मात्र व्यवस्थापकाने स्पष्ट केले की हे गाणे पुनरागमन नसून, अरिजितने निवृत्तीची घोषणा करण्याच्या खूप आधीच वचनबद्ध केलेला एक प्रकल्प आहे. अरिजित सिंग केवळ आपले जुने वचन पूर्ण करत होता. असे त्याच्या मॅनेजरने सांगितले, “अरिजित केवळ तेच प्रकल्प पूर्ण करत आहे जे त्याने निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी निश्चित केले होते. तो परत येत नसुन निवृत्ती पुर्वी आलेली कामे पुर्ण करत आहे.
‘अवारपन 2’ मधील ‘ये अवारपन’ हे गाणे सोनी म्युझिक इंडियाच्या बॅनरखाली प्रदर्शित झाले. याचे संगीत अमाल (amal)मलिक यांनी दिले असून, रश्मी विराग यांनी अत्यंत भावपूर्ण गीत लिहिले आहे. चित्रपटात शिवम पंडित ही प्रतिष्ठित भूमिका साकारणाऱ्या इम्रान हाश्मीवर चित्रित झालेले आहे. अरिजित सिंग या गाण्याच्या माध्यमातुन आता हे पुन्हा एकदा मुकेश भट्ट यांच्या निर्मिती संस्था, विशेष फिल्म्ससोबत काम केला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला अरिजित सिंगने पार्श्वगायनातुन निवृत्ती घेतली होती, त्यावेळी त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला होता मात्र त्याने पुढे सोशल मिडीयावर स्पष्ट केले की, त्याचा कल शास्त्रीय संगीत आणि स्वतंत्र संगीत निर्मितीकडे अधिक लक्ष द्यायचे आहे. आणि त्याने हे हि स्पष्ट केले की, तो संगीत निर्मिती कधीही थांबवणार नाही.
‘जना नायकन’ची 100 कोटींच्या ओपनिंगकडे वाटचाल; मोडणार अनेक चित्रपटांचे विक्रम ?









