अनेक अडचणी पार करून अखेर थलपती विजय अभिनित हा चित्रपट 23 जुलै रोजी चित्रपट गृहामध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज होताच तमिळनाडूमध्ये अक्षरशा एका पोंगल किंवा एखाद्या सणासारखा हा दिवस साजरा करण्यात आला. चित्रपटाच्या रिलीज दिवशी थेटर मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. तसेच विजयचे भव्य स्वागत करण्यात आले होते. सध्या हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांचे संमिश्र प्रतिक्रिया आता येत आहे. मात्र या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. केवळ 4 दिवसात या चित्रपटाने 100 कोटीचा टप्पा ओलांडला आहे.
‘जना नायकन’ने भारतासह परदेशात पण उत्तम कामगिरी केली आहे. तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 42.70 कोटीने सुरुवात केली. परंतु दुसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 21.15 कोटी रुपये कमाई केली आहे. तर तिसऱ्या दिवशी 28.50 कोटी कमावले आहेत. आणि चौथ्या दिवशी, 32 कोटी रुपये कमावले आहेत.
‘जना नायकन’ चित्रपटाने परदेशात चौथ्या दिवशी 10 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आणि आतापर्यत 71.50 कोटी रुपये जमा केले आहेत. तर भारतीय आणि परदेशात कमाई पाहता चित्रपटाने चार दिवसांत 217.48 कोटी कमावले आहेत.
‘जना नायकन’ हा चित्रपट विजयच्या अभिनय क्षेत्रातील हा लास्ट चित्रपट आहे. तो यानंतर या क्षेत्रामध्ये काम करणार नाही. तसेच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून तो तामिळनाडूचा नवा मुख्यमंत्री म्हणून निवडून आला, पण त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हि तो चर्चेत आहे. त्याला त्याच्या पत्नीने तलाखची नोटीस पाटवली आहे. मात्र अलीकडेच, संगीता आणि विजय यांच्या घटस्फोटाच्या खटल्यादरम्यान पुढिल अंतिम निर्णयापर्यत तिला, विजयच्या नीलंकराई येथील मालमत्तेत राहता यावे अशी विनंती केली आहे.
हेही वाचा
इंडियन आयडल 16’ची विजेती ठरली हि स्पर्धक; ट्रॉफीसह जिकंले 20 लाखांचे बक्षीस










