प्रदीप रावत हे एक बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार होते त्याच्या बाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे. त्याचे ७४ व्या वर्षी ब्लड कॅन्सर मुळे निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी खुप अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे अभिनेते गेल्या 5 वर्षापासुन रक्ताच्या कर्करोगाशी लढत होते. त्यानंतर ते काही काळासाठी बरे झाले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी कर्करोग पुन्हा परतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ते रुग्णालयात दाखल होते आणि मंगळवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज बुधवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.
अनेक कलाकांनी त्याच्या आठवणीना उजाळा देत त्यांच्या सोबतचे आठवणी शेअर केले आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर प्रदीप रावत यांचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे, “प्रदीप रावत भाई, तुमची आठवण नेहमीच येत राहील.” टीव्ही अभिनेता आयुषपाल शर्मानेही ‘गजनी’मधील गजनी आणि ‘लगान’मधील देवा या ंत्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.
प्रदीप (pradeep)रावत यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासात अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता त्याच्या जाण्याने त्याचे चाहते आणि अनेक कलांकार हळहळ व्यक्त करत आहेत.
हेही वाचा










