ओटीटी या प्लॅटफॅार्मवर अनेक मालिका, चित्रपट या वर्षभरात आल्या आणि त्यातल्या काही खुप गाजल्या मात्र ‘प्रितम अँड पेद्रो’ या वेब सीरिजने 2026 मध्ये ओटीटी विश्वात इतिहास रचला आहे. अर्शद वारसी आणि वीर हिरानी या कलाकारांची प्रमुख भुमिका असलेल्या या सीरीजला प्रेक्षकांकडुन प्रचंड प्रेम मिळाले आहे. कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे आणि या सीरीजच्या कथेमुळे हा शो आता 2026 मध्ये भारतातील सर्वाधिक पाहिला जाणारा ओटीटी शो बनला आहे. आणि IMDb वर याला 7.8 चे प्रभावी रेंटिग मिळाले आहे. या सिरीजने यशाची नवी उंची गाठली आहे.
प्रितम अँड पेद्रो हि सीरीज त्याच्या कथेमुळे आकर्षित करत आहे. ओरमॅक्स ओटीटी कंटेंट इनसाइट्सच्या ताज्या अहवालानुसार, या शोने आतापर्यत 23 दशलक्ष पेक्षाही अधिक युनिक व्हयुअर्स मिळावले आहेत. आणि त्याचे एकुण व्हयुज 27 दशलक्षपर्यत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तसेच 76 च्या दमदार ऑरमॅक्स पॉवर रेटिंगसह, या मालिकेने 2024 पासून भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी नॉन-फ्रँचायझी हिंदी वेब सिरीज हा किताबही पटकावला आहे.
याची साधी कथा, हलकाफुलका विनोद आणि सामाजिक संदेशामुळे हि मालीका प्रंंचड गाजली, तसेच अर्शद वारसी (varasi) आणि वीर हिरानी यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने देशभरातील प्रेक्षकांना मोहित केले आहे. त्यामुळे ‘प्रीतम अँड पेड्रो’ केवळ हिंदीमध्येच नव्हे, तर तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली, मराठी आणि कन्नड भाषेमध्येहि ट्रेंडिंगमध्ये अव्वल स्थानी आहे.
हेही वाचा
सोनू निगमने मुंबईच्या प्राइम लोकेशनवर घेतली येवढ्या कोटींची नवी कमर्शियल स्पेस










