Monday, August 24, 2026
Home बॉलीवूड मिर्झापुर द मुव्ही मधुन रवी किशन आणि सुशांत सिंह यांचे नवे पोस्टर झाले रिलीज

मिर्झापुर द मुव्ही मधुन रवी किशन आणि सुशांत सिंह यांचे नवे पोस्टर झाले रिलीज

‘मिर्झापूर: द मुव्ही’ हा एक आगामी बहुप्रतिक्षीत फिल्म आहे. हा चित्रपट रीलीज पुर्वीच बहुचर्चित आहे. तर सध्या निर्मात्यांनी आता रवी किशन, मोहित मलिक, सुशांत सिंग राजपूत आणि सोनल चौहान यांचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहेत. या चित्रपटात वी किशन बब्बन बबुआ, मोहित मलिक बिरजू लोहार, सुशांत सिंग राजपूत भैरव सिंग कर्णवत आणि सोनल चौहान मुमताज बीबी यांची भूमिका साकारनार आहेत. या कलाकारांचे सुंदर फस्ट लुक पोस्टर रीलीज करण्यात आले आहे.

‘मिर्झापूर: द मुव्ही’ ची कथा मुख्यत: पंकज त्रिपाठी. अली फजल आणि दिव्येंदु गुप्ता यांच्याभोवती फिरते. तर सध्याचा हा पोस्टर एक्सेल मुव्हीजने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तसेच काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. ज्यामध्ये पंकज त्रिपाठी, रवी किशन आणि इतरांमध्ये मिर्झापुरच्या सिंहासनासाठी लढाई होत असल्याचे दिसले होते. मात्र चित्रपट रीलीज नंतरच पुर्ण कहाणी आपल्याला समजेल. पण ही कहानी जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक आता खुप उत्सुक झाले आहेत.

‘मिर्झापूर: द मुव्ही’ अनेक दिग्गज कलाकार आहेत. पंकज (Pankaj) त्रिपाठी, दिव्येंदू, अली फजल, जितेंद्र कुमार, रवी किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी, सोनल अन्नसांग, चोहानस्वा, चौहानस्वा, . सत्येंद्र सोनी, कुलभूषण खरबंदा आणि सुशांत सिंग राजपूत प्रमुख भूमिकेत असुन हा चित्रपट 4 संप्टेबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा

आदित्य सील-अनुष्का रंजन यांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन, जुळ्या मुलींचे झाले आई-बाबा

हे देखील वाचा