यश हा एक साउथ सुपरस्टार आहे. त्याचे आतापर्यत अनेक चित्रपट आले आणि ते गाजलेसुध्दा आणि आता सध्या त्याचा चित्रपट टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर सुरुवातीला कमाई उत्तम केली, मात्र नंतर या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट होताना दिसली. तर यश या चित्रपटाने 101 कोटीहुन जास्त सुरुवातीलाच कमाई केली होती. तर मंगळवार प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी चित्रपटाने 8.20 कोटी कमावले. तर काहिनी या चित्रपटाचे आणि यशचे कौतुक केले आहे. आणि आता दिग्दर्शक आदित्य धर यांनीही यशच्या ‘टॉक्सिक’ला आपला पाठींबा दाखवला आहे.
आदित्य धर (Dhar)यांनी सोशल मिडीयावर यशला पाठिंबा दाखवत प्रोत्साहन दिले आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी जरी लांब पोस्ट लिहली नसली तरी त्यांनी या चित्रपटांबाबतचा उत्साह व्यक्त केला आहे. आणि त्यांच्या लहानश्या कॅप्शनने आणि इमोजीने सर्व काही व्यक्त होते. या पोस्ट मध्ये त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर ‘टॉक्सिक’मधील यशचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याचे कौतुक केले. कन्नड सुपरस्टारला टॅग करून, त्याने ‘यश’ असे लिहिले आणि बायसेप व लाल हृदयाचा इमोजी पोस्ट करत चित्रपटाचे कौतुक केले.
‘टॉक्सिक’ हा चित्रपट खरे तर 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता मात्र त्याच दिवशी आदित्य धर याचा धुरंधर 2 हा चित्रपट देखील त्याच वेळी रीलीज होणार होता त्यामुळे यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटाची डेट पुढे ढकलण्यात आली होती. तसेच या ‘टॉक्सिक’ चित्रपटाबाबत अनेक प्रेक्षक उत्सुक होते. त्यामुळे या चित्रपटाला रिलीज पुर्वी आणि सुरुवातीला उत्तम प्रतिसाद दिसुन आला.
हेही वाचा










