Friday, September 11, 2026
Home बॉलीवूड तुम्हीच आमची आशा…, प्रोटीनच्या डब्यामध्ये चक्क किडे, बिपाशा बासूने तुकाराम मुंढेंना केलं टॅग

तुम्हीच आमची आशा…, प्रोटीनच्या डब्यामध्ये चक्क किडे, बिपाशा बासूने तुकाराम मुंढेंना केलं टॅग

बिपाशा बसूने एका पौष्टीक प्रोडक्ट संबधित अन्नसुरक्षेच्या समस्येबाबत तक्रार केली केली आहे. अभिनेत्रीने गुरुवार 10 सप्टेंबर रोजी तिच्या इंस्टास्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि तिने असे म्हणले आहे की, तिला एका उत्पादनामध्ये लहान किटक सापडले आहेत. त्यामुळे तिने हा व्हिडिओ महाराष्ट्र अन्न व प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांना टॅग करत तिने हे प्रकरण मांडले आहे. आणि आश्या प्रकारच्या भेसळीला आळा घालण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. या आधी श्वेता तिवारीने ऑनलाइन मागवलेल्या पेयामध्ये एक झुरळ निघाल्याने तिनेही या प्रकरणाची कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र FDA आयुक्तांना आवाहान केले होते. 

अभिनेत्री बिपाशा (bipasha)बसुने हा व्हिडीओ झुम करुन एक लहान किटक दाखवले आहे. यामध्ये तिने म्हणले आहे की, हे पौष्टीक उत्पादन किटकांनी भरलेले आहे. अगदी लहान किटक आहेत. आणि आम्ही हा ओपन केलेला नवीन बाॅक्स आहे. या क्पिपसोबत बिपाशाने तुकाराम मुंडे यांना टॅग करुन लिहले आहे की, तुम्हीच आमची शेवटची आशा आहात.. जेणेकरुन आम्ही जे काही खरेदी करतो, ते आम्हाला निकृष्ट किंवा भेसळयुक्त वस्तु मिळणार नाहीत.

अभिनेत्री कामाच्या बाबत बोलायचे झाल्यास बिपाशाने अजुन तरी कोणताही प्रोजेक्ट जाहीर केला नाही. ती काही वर्षापासुन कोणताही चित्रपट साइन केला नाही मात्र तिच्या सोशल मिडीयावर ती ऍक्टीव असते. आणि ती शेवटची 2020 च्या डेंजरस या वेब सीरीजमध्ये दिसली होती. तर तिचे चाहते तिच्या पुनरआगमनाची वाट पाहत आहेत.

हेही वाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राणी मुखर्जीचा सन्मान; मंचावर भावूक झाली अभिनेत्री

हे देखील वाचा