Saturday, September 12, 2026
Home बॉलीवूड हैवानची बॅाक्स ऑफिसवर संथ सुरुवात, चित्रपटाने पहिल्या दिवशी केली फक्त इतकी कमाई

हैवानची बॅाक्स ऑफिसवर संथ सुरुवात, चित्रपटाने पहिल्या दिवशी केली फक्त इतकी कमाई

अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या हैवान चित्रपटाची पहिल्या दिवसांची कमाई किती झाली याचा अहवाल आता आला आहे. ‘हैवान’ हा चित्रपट प्रियदर्शन यांच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट शुक्रवार 11 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. 2025 मध्ये निधन पावलेल्या असरानी यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. त्यांनी जगाचा निरोप घेण्यापुर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण केले होते. चला पाहुया हैवानने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे. 

सॅकनिल्कच्या नुसार हैवान’ने भारतात पहिल्याच दिवशी 3 कोटी रु कमीवले आहेत. 7224 शोमध्ये चित्रपटाला 11% प्रेक्षक उपस्थित राहिले होते. तर सकाळच्या शोमध्ये सुमारे 5% होती. गेल्या आठवड्यात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेल्या मिर्झापुर या चित्रपटासोबत स्पर्धा होती, तर आठव्या दिवशी मिर्झापुरने 6,763 शोजमधुन रु 9.00 कोटींची निव्वळ कमाई केली. यामुळे भारतातील एकुण कमाई 187.55 कोटी आणि एकुण निव्वळ कमाई 157.45 कोटी झाली आहे. तर आता हैवान हा चित्रपट या वीकेंडला कशी कामगिरी करतो हे पाहण्यासारखे आहे.

हैवानचे सह-लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. तर निर्मिती केव्हीएन प्रोडक्शन्स आणि थेस्पियन फिल्म्स यांनी केली आहे. हा दिग्दर्शकाच्याच 2016 सालच्या ओप्पम या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. आणि या चित्रपटात मोहनलाल आणि समुथिरकानी यांनी भूमिका केल्या होत्या. आणि हैवान मध्ये सैफ अली खान, अक्षय कुमार, बोमन (boman)इराणी, श्रिया पिलगावकर, आणि सैयामी खेर यांच्या प्रमुख भुमिका आहेत.

हेही वाचा

12वी नापास हसीना समय रैनाच्या आयुष्यात? वेकेशनच्या फोटोमंधुन चाहत्यांनी लावला अंदाज

हे देखील वाचा