सरकाने CBFC च्या नवीन समितीसाठी 18 सदस्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याने चित्रपटांच्या प्रमाणिकरणाशी संबंधित असलेल्या केंद्रिय चित्रपट मंडळात आता एक नवीन समिती काम करणार आहे. या नवीन नियुक्त होणाऱ्या सदस्यामध्ये दिग्गज कलाकाराचा समावेश आहे. या नवीन यादी मध्ये प्रिती झिंटा, पंकज त्रिपाठी, सुनील शेट्टी, रूपाली गांगुली, पल्लवी जोशी आणि प्रोसेनजीत चॅटर्जी यांचा समावेश आहे. तसेच दिग्दर्शक प्रियदर्शन आणि ग्रॅमी पुरस्कार विजते संगीतकार रिकी केज यांचाही समावेश आहे.
या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या नवनियुक्त मध्ये एकुण सुनील (Sunil) शेट्टी, प्रियदर्शन, पंकज त्रिपाठी, प्रिती झिंटा, मनोज जोशी, विनोद अनुपम, रिकी केज, हंसराज हंस, सुप्रिया यारलागड्डा, यतींद्र मिश्रा, रूपाली गांगुली, नील माधव पांडा, प्रोसेनजीत चॅटर्जी, पल्लव जोशी, निशिगंधा वाड, वामन केंद्रे आणि रमेश पतंगे यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.
CBFC काय करते आणि यांचे काम काय असचे हे पाहायचे झाल्यास कोणताही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापुर्वी त्यांची तपासणी केली जाते. सिनेमॅटोग्राफ कायदा,1952 , आणि लागू असलेले प्रमाणन नियम व सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य आहे का, तसेच CBFC फक्त चित्रपट प्रदर्शीत होऊ शकते की नाही हेच ठरवत नाही तर चित्रपटाच्या आशयावर प्रमाणपत्र देखील देते. नियमांनुसार UA श्रेणीमध्ये UA 7+, UA 13+, आणि UA 16+ यांसारख्या नवीन वय- अश्या प्रकारचा प्रमाणपत्राचा समावेश आहे.
हेही वाचा
बादशाहसोबतचा घटस्फोट का झाला? ईशा रिखीने बिग बॉसमध्ये केला मोठा खुलासा










