[rank_math_breadcrumb]

राधिका आपटेला या कारणामुळे बसला धक्का, ४ दिवस घरात घेतलं कोंडून

अनेक कलाकार हे त्याच्या मालिका आणि चित्रपटांमध्ये बोल्ड सीन मुळे ट्रोल होतात. त्यातील काही अत्यंत गाजलेले आणि दिग्गज कलाकारांचा देखील यात समावेश आहे. दिपीका पदुकोण, सिध्दांत चतुर्वेदी यांच्या गहरियाँ यातील हॅाट सीन मुळे ट्रोल करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपुर्वी यशचा टाॅक्सिक रीलिज होण्यापुर्वी टाॅक्सिक चित्रपटाच्या टिझर वरुनच तो बोल्ड सीनमुळे ट्रोल झाला होता. त्याचप्रमाणे राधिका आपटे देखील तिच्या चित्रपटांतील बोल्डसीनमुळे ट्रोल झाली आहे. या बोल्ड सीनमुळे तिच्या आयुष्यात असा क्षण आला की, तीने स्वत:ला कोंडुन घतले. हे तेव्हा झाले जेव्हा तिच्या चित्रपटातील एक खाजगी सीन तिच्या परवाणगी शिवाय लीक झाला होता.

राधिका (radhika)आपटेचा तो चित्रपट म्हणजे क्लीन शेव्हन आहे. तर लस्ट स्टोरीज ३ या चित्रपटामुळे ती सध्या चर्चेत आली आहे. आणि हा चित्रपट नुकतच नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. तसेच तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, जेव्हा एका चित्रपटातील खाजगी व्हिडीओ लीक होताच, ती खुप घाबरुन गेली आणि तिने 4 स्वत: कोंडून घेतले होते आणि चार दिवस ती बाहेर पडली नव्हती. ती म्हणाली की, चित्रपटात एखादे जिव्हाळ्याचे दृश्य चित्रित करणे हा एक व्यावसायिक निर्णय असू शकतो, पण परवानगीशिवाय ते व्हिडिओ लीक कल्यावर खुप त्रास होतो.

राधिकाने पुढे सांगितले की, तिच्या वाॅचमनने आणि तिच्या स्टायलिस्टच्या ड्रायव्हरने देखील तो व्हिडीओ पाहिला होता. आणि तो पुन्हा पुन्हा तो सीन पाहत आणि त्याने तिला विचारलं होत की तु याच्याच घरी कामाला जातेस ना. तसेच माझ्या वॅाचमन देखील पाहीलं होत, ही परिस्थीती इतकी बिघडली होती की, हाताळ कठीण झालं होत.

हेही वाचा

बिहारमधील पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरला सोनू सूद, घटनास्थळी जाऊन केली मदत