अजय देवगण हा त्याच्या नुकत्यात प्रदर्शित झालेल्या दमदार चित्रपटामुळे चर्चेत आहे. दृश्यम 3 या चित्रपट कालच म्हणजेच शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा चित्रपट सस्पेन्स आणि रहस्यमय असल्याने अनेक प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. आणि त्यामुळे चित्रपटाच्या प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांच्यासह नवीन कलाकारांचाही समावेश आहे. आणि त्यांच्या कथेतील प्रवेशाने प्रेक्षकांमध्ये प्रेचंड उत्साह निर्माण केला आहे. आणि आता अजय देवगणच्या दृश्यम 3 बाबत सोशल मीडीया वापरकर्ते काय म्हणतात ते पाहुया.
दृश्यम 3 हा अभिषेक पाठक दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात अजय (ajay)देवगण सोबत तब्बू, श्रिया सरन, प्रकाश राज आणि जयदीप अहलावत यांसारखे प्रसिद्ध कलाकार आहेत. या मुळे अजुन प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आणि या चित्रपटाची पुढील कहाणी काय असेल यासाठीही अनेक प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत होते.
ट्विटरवर अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. एका प्रेक्षकाने टिप्पणी केली, “मी ‘दृश्यम ३’ पाहिला आहे, आणि या वेळी विजय साळगावकरच्या कथेत काय दडले आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतःच हा चित्रपट पाहिला पाहिजे. आणि अनेकांनी अजयच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तर एकाने उत्तम दिग्दर्शन आहे असे म्हणले आहे.
एका युझरने चित्रपटाच्या पूर्वार्धाचे कौतुक करत लिहिले, “चित्रपटाचा पूर्वार्ध उत्कृष्ट आहे.” दुसऱ्याने लिहिले, “दृश्यम 3 मधील क्लायमॅक्स ट्विस्ट दृश्यम 1आणि दृश्यम 2 पेक्षा चांगला आहे.
हेही वाचा
ममता कुलकर्णी डान्स वाद: ‘बरं झालं तेव्हा इन्स्टाग्राम नव्हतं’; ट्रोलिंगनंतर अभिनेत्रीने सोडले मौन










