आदित्य धर आणि यामि गौतम आता हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यापैकी एक आहे. तसेच त्याच्या कामाबाबत पाहायचे झाल्यास आदित्य धर दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे, तर दुसरीकडे यामी गौतमने आपल्या अभिनयाने संपूर्ण देशाच्या मनात स्थान मिळाले आहेत. तर या उत्तम कामगिरीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात मात्र ते आता अजुन एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे यामी आणि आदित्य यांनी हिमाचल प्रदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे यामीचे माहेर आहे.
एका वृतानुसार यामी गौतम आणि आदित्य धर यांनी कायमची मुंबई सोडुन हिमाचल मध्ये वास्तव करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनीही आपले वैयक्तिक जीवन या प्रसिध्दीच्या दुनियेपासुन दुर ठेवायचे आहे असे म्हणले आहे. तसेच कामासाठी ते हिमाचल प्रदेश आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी वेळ घालवत होते. पण आता त्या दोघांनी हिमाचल प्रदेशात कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. ते फक्त कामासाठी मुंबईला प्रवास करतील. आणि त्यांचे लग्न 2021 मध्ये हिमाचल प्रदेशात झाले होते.
यामी (yami)गौतमचे घर हिमाचलमधील 100 वर्षे जुन घर लाकुड आणि दगडाचे बनलेले आहे. घराभोवती फळ, बागा आहेत. तसेच यामीने याला एक नवे सेलिब्रेटी होममध्ये रुंपातरित करण्याऐवजी यामीने ते साधे ठेवले आहे.
यामीच्या कामाबाबत पाहयचे झाल्यास तिचा आता ‘नयी नवेली’ या हॉरर-थ्रिलरमध्ये हा चित्रपट येत आहे. आणि आदित्य धर हा ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या चित्रपटांमुळे चर्चेत आला होता. त्याच्या पुढील कामीची अजुन कोणतेही अपडेट समोर आली नाही.
हेही वाचा
विद्या बालन १७ वर्षांनंतर आर. बाल्कींसोबत करणार काम; नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात










