Saturday, November 14, 2026
Home › बॉलीवूड › समय रैनाने हुमा कुरैशीला बॅाक्स ऑफिसवरून डिवचले, इंडियाज गॅाट लेटेंट मध्ये अभिनेत्रीचा पलटवार

समय रैनाने हुमा कुरैशीला बॅाक्स ऑफिसवरून डिवचले, इंडियाज गॅाट लेटेंट मध्ये अभिनेत्रीचा पलटवार

काॅमेडियन समय रैना हा नेहमीच त्याच्या कामामुळे आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकतच त्याने अभिनेत्री हुमा कुरेशीच्या टाॅक्सिक या चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिस कमाईवर विनोदी टोला लावला आहे. नुकत्याच झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ सीझन 2 च्या भागात समयने हुमाला चित्रपटाच्या कामगिरीवरून चिडवले आणि गंमतीने म्हटले की, बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर ती या शोमध्ये आली आहे. या भागात पॅनेलिस्ट कृष्णा अभिषेक, आशिष सोलंकी आणि बलराज सिंग घई यांचाही समावेश होता.

या भागात समयने (samay)हुमाला टोला लावला की, सहसा लोक इंडियाज गाॅट लेटंट मध्ये येतात आणि मग त्यांचे चित्रपट फ्लाॅप होतात. पण तु पहिली व्यक्ती आहेस जिचा चित्रपट फ्लाॅप झाला आणि मग तु आलीस मात्र, हुमाने लगेचच सडेतोड उत्तर देले, आणि ती म्हणाली की, मित्रा, मी फक्त टाॅक्सिक नावाच्या चित्रपटात काम केलं आहे, पण खऱ्या आयुष्यात तु स्वत:च टाॅक्सिक आहेस.

तसेच हा संवाद पुढे चालुच राहिला, समयने यावर उत्तर दिले की, पण निदान लोक माझ्याकडे लक्ष तरी देतात, असा त्याच मजेशीर संवाद सुरु राहीला आणि या भागात त्याची ही नोकझोक एक उत्तम भाग झाला. तर या इंडियाज गॉट लेटंट’ सीझन 2चा एपिसोडमध्ये कॉमेडियन बलराज सिंग घई देखील असुन अजुन अनेक मजेशीर गोष्टी या भागात झाल्या, आणि तुम्हाला या गोष्टी पाहायच्या असतील तर याचा भाग तो आता नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

हेही वाचा

गोविंदासोबत कोमल राणीचे रोमँटिक फोटो व्हायरल, फोटो पाहताच नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

हे देखील वाचा