Wednesday, February 4, 2026
Home मराठी अभिनेत्री कंगनाने केला पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट! ट्रोलर्सने घेतलाय चांगलाच समाचार

अभिनेत्री कंगनाने केला पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट! ट्रोलर्सने घेतलाय चांगलाच समाचार

कोरोनाचा जप करता करता अखेर हे वर्ष सरलं एकदाचं! परंतु आपल्या भारतात कोरोनापेक्षाही जर कुणाच्या नावाची जास्त चर्चा झाली असेल ती म्हणजे कंगना रनौतची! दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर तिने नेपोटीझमचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर सतत माध्यमांतून तिचं मत व्यक्त करत राहिली. यानंतर तिला ड्रग्जचा मुद्दा मिळाला आणि त्यावर ती बोलू लागली. असे एकावर एक मुद्दे ती शोधतच राहिली. मग मुंबईची सुरक्षा, बॉलिवूड कलाकारांना नावं ठेवणं, शेतकरी आंदोलन अशा सर्व प्रकरणांमध्ये ती कायम बोलत राहिली आणि चर्चेत राहिली. कदाचित हेच तिचं एकमेव ध्येय असावं…

कंगना नेहमी तिचं मत हे सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत राहिली. अनेकांनी तिच्या या मतांना पाठींबा दिला तर अनेकांनी विरोधदेखील केला. अनेक जण हे कंगनाला सोशल मिडियावर फॉलो करत असतात. या तिच्या चाहत्यांसाठीसुद्धा कंगना राजकीय विधानांव्यतिरिक्त सोशल मीडिया अकाउंटवर काही ना काही टाकत असतेच. परंतु यावेळेस तिने एक फोटो अपलोड केला आणि ती पुन्हा चर्चेत आली. यावेळी अनेकांनी तिच्या या फोटोला विरोध दर्शवला. बऱ्याचदा कंगना आपल्याला केंद्र सरकारची बाजू घेताना दिसत असते. त्यामुळे ट्रोलर्सने तिला या मुद्द्यावरूनही बोलणं काही सोडलं नाही.

https://twitter.com/KanganaTeam/status/1341580240062087168

खरं तर कंगनाने तिच्या ट्विटर अकाउंटवरून फार पूर्वीचा एक फोटो अपलोड केला. ज्यात ती समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून बसलेली पाहायला मिळतेय. तिचा हा फोटो मात्र पाठमोरा काढला गेला आहे. या तिच्या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी, हीच तूझी संस्कृती आहे का? किंवा तुझे असे फोटो पाहिल्यावर मोदी साहेबांना काय वाटेल? इथपर्यंत तिच्या फोटोंना कमेंट्स आल्या आहेत. हा फोटो म्हणजे काही वर्षांपूर्वी कंगना मेक्सिकोला फिरायला गेली होती तेव्हा तिथल्या एका टापूवर तिने हे फोटोशूट केलं होतं. या फोटोमुळे कंगना भयंकर ट्रोल होत असून हा फोटो अपलोड करणं तिला चांगलंच महागात पडलेलं दिसत आहे.

हे देखील वाचा