Friday, January 16, 2026
Home अन्य आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ होय. या शोने मागील ५ वर्षांपासून चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यातील कलाकारांनीही इतक्या वर्षात आपल्या भूमिकेने चाहत्यांना आपलेसे केले आहे. मागील काही फेब्रुवारीपासून हा शो बंद आहे. मात्र, आता शो पुन्हा सुरू होण्याचे संकेत कलाकारांनी दिले आहेत. या शोमधील विनोदी कलाकार भारती सिंगने सोशल मीडियावर एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदाही दिसत आहेत. भारती सिंगने हा व्हिडिओ शेअर करत शो सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. (Comedian Bharti Singh And Krushna Abhishek Announces The Kapil Sharma Show Return On TV Soon)

या व्हिडिओत दिसत आहे की, कृष्णा अभिषेक आणि कीकू  शारदा म्हणत आहेत की, द कपिल शर्मा शो पुनरागमन करणार आहे. भारती सिंग कॅमेरा कृष्णाकडे फिरवते. यावेळी तो म्हणतो, “होय आम्ही परत येतोय.” यानंतर ती कीकू शारदालाही फ्रेममध्ये घेते, तेव्हा कीकूही म्हणतो की, “होय आम्ही परत येत आहे.”

कृष्णानेही भारती आणि कीकूसोबत फोटो शेअर केला होता. मात्र, यानंतर त्याने हा फोटो डिलीट केला. तिघेही कॅमेऱ्यात पाहून हसत होते. त्याने फोटो शेअर करत लिहिले होते की, “आम्ही लवकरच परत येत आहोत. आमची पहिली क्रिएटिव्ह मीटिंग झाली आहे. यामुळे आम्ही खूप उत्साही आहोत. नवीन गोष्टी येतील.”

‘द कपिल शर्मा शो’ फेब्रुवारी महिन्यापासून बंद होता. कारण कपिल शर्माने पालकत्व रजा घेतली होती. त्याला आपली पत्नी गिन्नी चतरथसोबत वेळ घालवायचा होता.

कृष्णा अभिषेक भारती सिंग आणि कीकू शारदा हे तिघेही खूपच विनोदी कलाकार आहेत. त्यांची कॉमेडी सर्वत्र पसंत केली जाते. त्यांचा आपापला चाहतावर्ग आहे. विशेष म्हणजे यातील कृष्णाने चित्रपटातही काम केले आहे. तो आपल्या अभिनयाच्या बाबतीत खूपच गंभीर आहे. त्याने कश्मीरा शाहसोबत लग्न केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट

-‘शालू’च्या डान्सने पुन्हा चोरली लाखो मने; बघता बघताच पडला लाईक अन् कमेंट्सचा पाऊस

-टायगर श्रॉफने केली मस्क्युलर बॉडी फ्लॉन्ट; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा