Saturday, May 23, 2026
Home अन्य बापरे! ‘एनसीटी टेल’च्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; १ तास ४५ मिनिटांत इंस्टाग्रामवर झाले ‘इतके’ लाख फॉलोवर्स

बापरे! ‘एनसीटी टेल’च्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; १ तास ४५ मिनिटांत इंस्टाग्रामवर झाले ‘इतके’ लाख फॉलोवर्स

अनेक कलाकार त्यांच्या कला जगासमोर आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. या सोशल मीडियावर जेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात नेटकरी फॉलो करतात, तेव्हाच तुमच्या कलेची आणि तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटची चर्चा होते. फॉलोवर्स वाढवण्यासाठी लोकं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवतात आणि फॉलोवर्स वाढवतात. मात्र, असे देखील काही कलाकार आहेत, ज्यांना त्यांचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी काहीही करायची गरज पडली नाही.

आंतरराष्ट्रीय म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एनसिटी हा ग्रूप सर्वात प्रसिद्ध आहे. या ग्रूपमधील टेल हा सर्वात जुना सदस्य आहे. तो ‘एनसिटी टेल’ या नावाने ओळखला जातो. सोबतच टेल हा त्याच्या सुमधुर आवाजसाठी देखील तितकाच ओळखला जातो. मात्र, आता टेल एका नवीन गोष्टीसाठी ओळखला जाणार आहे. टेलने नुकतेच एक विश्वरेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

टेलने नुकतेच इंस्टाग्रामवर त्याचे अकाऊंट सुरू केले. जुलै रोजी टेलने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट चालू केले, आणि आगामी १ तास ४५ मिनिटांमध्ये त्याच्या फॉलोवर्सच्या संख्येने मिलिअनचा टप्पा ओलांडला आहे. ही माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिली आहे. १३ जुलै रोजी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सांगितले की, “टेलने केवळ १ तास ४५ मिनिटांमध्ये अतिशय वेगाने १ मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे, हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याच्या या रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे.”

एनसीटी ग्रूपमधील २३ पैकी १४ सदस्यांचे आधीच इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. २०२०मध्ये एनसीटीने पुन्हा दमदार पदार्पण करण्यासाठी आणि आणि बँडचे प्रमोशन करण्यासाठी ग्रूपमधील काही सदस्यांनी इंस्टाग्राम अकाऊंट सुरू केले. या ग्रूपमधील लुकास आणि टेन या दोघांनी सर्वात आधी इंस्टाग्राम अकाऊंट ओपन केले होते.

टेलच्या लोकप्रियतेबाबत कोणतीच शंका नाही. मात्र, आश्चर्य या गोष्टीचे आहे की, टेलने त्याच्या या अकाऊंटवर त्याची ओळख पटावी असे कोणतेही चिन्ह ठेवले नव्हते. त्याचा फोटो, त्याच्या ग्रूपची माहिती आदी. त्याने केवळ ‘के पॉपअप बबल’ या ऍपवर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटची माहिती दिली होती. हे ऍप वापरणारे खूप कमी लोकं आहेत. बहुतकरून लोकांकडे त्याच्या या ऍपचा ऍक्सेस नाही. तरी देखील केवळ १ तास ४५ मिनिटात त्याने १ मिलियन ही फॉलोवर्सची जादुई संख्या मिळवली आहे.

टेलने सर्व नेटकऱ्यांना या प्रेमाबद्दल धन्यवाद म्हटले आहे. त्याने कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “मी तुम्ही दाखवलेल्या या प्रेमाबद्दल खूप आनंदी आहे. मला वाटले नव्हते की तुम्ही मला एवढा चांगला प्रतिसाद द्याल. आपण प्रत्येक जण या अकाऊंटचा वापर करून एकमेकांशी उत्तम प्रकारे संवाद साधू.”

सध्या त्याचे १.९ मिलियन फॉलोवर्स आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा