Saturday, May 23, 2026
Home अन्य ‘गोमाता’ला गोंजारताना दिसल्या गायिका अमृता फडणवीस; गोंडस फोटोने वेधलं अवघ्या सोशल मीडियाचं लक्ष

‘गोमाता’ला गोंजारताना दिसल्या गायिका अमृता फडणवीस; गोंडस फोटोने वेधलं अवघ्या सोशल मीडियाचं लक्ष

आज अमृता फडणवीस हे नाव कोणाला माहित नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांनी यापेक्षाही त्यांची एक वेगळी ओळख तयार केली आहे. अमृता यांना ब्युटी विथ ब्रेन म्हणून देखील संबोधले जाते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या अमृता या एक बँकर असण्यासोबतच, एक गायिका देखील आहे. शास्त्रीय संगीताचे शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी प्रशिक्षण देखील घेतले आहे.

सोशल मीडियावर अमृता खूप सक्रिय आहेत. त्या नेहमी वेळ काढून त्यांचे सोशल मीडिया अपडेट करण्यासोबतच त्यांचे काही फोटो, व्हिडिओ देखील पोस्ट करत असतात. नुकताच त्यांचा एक सुंदर फोटो इंस्टाग्राम अकांऊटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अमृता जीन्स टॉपमध्ये दिसत असून त्यांच्यासोबत दिसणारी गायीची दोन वासरं सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. पांढऱ्या आणि पिवळसर रंगाची हा वासरं अतिशय गोड आणि सुरेख दिसत आहे.

या दोन वासरांसोबत फोटो पोस्ट करताना ‘गौमाता_राष्ट्रमाता’, ‘गौमाता’ असे हॅशटॅग देखील वापरलेले दिसत आहे. अमृता कुठे जात असताना त्यांना रस्त्यात ही गोंडस वासरे दिसली असे वाटत आहे. त्यांच्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या त्यांचे हे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या गाण्यातून त्यांची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. अनेक म्युझिक अल्बम सोबतच त्यांनी प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ या सिनेमातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले आहे. यासोबतच त्या अनेक चॅरिटी इव्हेंटमध्ये देखील अनेकदा त्यांच्या गायनाने रसिकांचे मनोरंजन करतात. त्यांच्या गाण्यांमुळे त्या अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल देखील झाल्या आहेत. सोबतच त्या सोशल मीडियावर त्यांची परखड मतं देखील नेहमी मांडताना आपल्याला दिसतात. गायिका, बँकर असण्यासोबतच त्या एक समाजसेविका देखील आहे. या त्यांच्या फॅशन सेन्ससाठी, त्याच्या वेशभूषेची देखील प्रकाशझोतात येतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा