Thursday, March 13, 2025
Home अन्य ‘तू राहुल वैद्यच्या लग्नाला जाणार का?’, पॅपराजींनी विचारलेल्या प्रश्नावर निक्की तांबोळीने ‘असे’ दिले उत्तर

‘तू राहुल वैद्यच्या लग्नाला जाणार का?’, पॅपराजींनी विचारलेल्या प्रश्नावर निक्की तांबोळीने ‘असे’ दिले उत्तर

‘बिग बॉस’ या शोमध्ये जाणारे स्पर्धक शोमधून जेव्हा बाहेर येतात, तेव्हा त्यांच्यासाठी एक ग्लॅमर आणि लोकप्रियतेने भरलेले जग वाट पाहत असते. या शोनंतर त्यांची एक वेगळीच ओळख बनलेली असते. अशीच एक बिग बॉस 14 या पर्वाची स्पर्धक निक्की तांबोळी ही मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. निक्की नुकतेच पॅपराजींच्या घोळक्यात सापडली आहे. नुकतेच ती पॅपराजींना रस्त्यावर स्पॉट झाली आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल भयानीने हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, निक्कीने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. तसेच तिने लाल रंगाची बॅग घेतली आहे. जेव्हा पॅपराजी तिला पोझ देण्याबाबत विचारतात तेव्हा ती म्हणते की, “पाऊस आला आहे मी भिजत आहे.” यावर पॅपराजी म्हणतात की, ‘पाऊस नाहीये. तू आलीस आणि पाऊस गेला.” यानंतर ती तिच्या गाडीजवळ जाते आणि पोझ देताना दिसत आहे. ती नंतर पुन्हा छत्री घेते आणि छत्रीसोबत पोझ देते. (Bigg Boss fame Nikki tamboli spot on road, let’s watch video)

निक्की जेव्हा गाडीत बसते, तेव्हा पॅपराजी तिला विचारतात की, “तू राहुल वैद्यच्या लग्नाला जाणार आहे का?” या प्रश्नाचे उत्तर न देता ती पॅपराजींना बाय असे म्हणते आणि हा प्रश्न टाळते.

निक्की तांबोळी ही ‘बिग बॉस 14’ मध्ये दुसरी रनरअप विजेती होती. तिने ‘कंचना 3’, ‘थायपारा मिसम’ या चित्रपटात काम केले आहे. पण बिग बॉसनंतर तिला खूप ओळख मिळाली. तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा