दक्षिण भारतीय चित्रपटांमधील सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जाणारा धनुष्य आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. या दिवशी त्याला सर्वच स्तरातून फॅन्स, मित्र, नातेवाईक वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. सामान्यपणे वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला गिफ्ट दिले जाते, मात्र आज धनुषने त्याच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधत त्याच्या फॅन्सला आणि प्रेक्षकांना एक अनोखी भेट दिली आहे.
आज धनुषने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, त्याच्या दिग्दर्शक कार्तिक नरेन यांच्यासोबतच्या आगामी तामिळ चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘मारन.’ सोशल मीडियावर या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली गेली. (Dhanush release his maarn movie poster )
Very happy in presenting you the first look of our next film #Maaran #மாறன் with @dhanushkraja ????#MaaranFirstLook #HappyBirthdayDhanush @karthicknaren_M @MalavikaM_ @gvprakash @Lyricist_Vivek @thondankani @smruthi_venkat @KK_actoroffl @Actor_Mahendran pic.twitter.com/qyWdFuQNju
— Sathya Jyothi Films (@SathyaJyothi_) July 28, 2021
‘मारन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सिनेमाचा फर्स्ट लूक आणि सिनेमाच्या नावाची घोषणा केली आहे. हे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, “तुमच्या सर्वांसमोर आमच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. #मारन.” या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये धनुष्य काचेवर कोणाचातरी चेहरा फोडताना दिसत आहे. सोबतच त्याच्या हातात चाकू देखील दिसत आहे. धनुषला या पोस्टरमध्ये एकदम अग्रेसिव्ह रूपात आपण पाहू शकतो. हे पोस्टर पोस्ट केल्या केल्या तुफान व्हायरल झाले आहे. धनुषच्या या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर फॅन्सकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या सिनेमात धनुषसोबत मालविका मोहनन दिसणार आहे. हे दोघं या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर सोबत दिसणार आहे. हा सिनेमा एक ऍक्शन थ्रिलर सिनेमा असून या वर्षाच्या शेवट्पर्यंत प्रदर्शित होऊ शकतो. धनुषचा ‘जगमे थांधीराम’ हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
धनुषने वयाच्या १९ व्या वर्षीच चित्रपटांमध्ये पदार्पण केले. साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या धनुषने आनंद एल. राय यांच्या ‘रांझणा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लवकरच तो अक्षय कुमार आणि सारा अली खानसोबत आनंद एल. राय यांच्या ‘अतरंगी रे’ सिनेमात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राजकुमार राव- राधिका आपटे नेटफ्लिक्सवर झळकणार एकत्र; ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा पहिला लूक आला समोर










