Sunday, September 13, 2026
Home बॉलीवूड फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

‘यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है!’ ‘मैत्री’ दोन अक्षरांचा असणारा हा शब्द लाख मोलाचा अर्थ सांगणारा आहे. अनेक व्याख्या, अनेक विचार या पलीकडे जाऊन असणारे मैत्रीचे नाते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असते. प्रत्येक व्यक्तीच्या नजरेतून याच ‘मैत्री’चा एक वेगळा अर्थ, एक वेगळी व्याख्या आपल्याला ऐकायला मिळते. असे म्हणतात. “देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो, त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.” अगदी योग्य आहे. कारण आपल्या कुटुंबाच्या बाहेरच आपले जिवाभावाचे मित्र मैत्रिणी असतात. इतर नात्यांपेक्षा हे नाते नक्कीच वेगळे आणि घट्ट असते. ‘मैत्री’ हे एकमेव असे नाते आहे, जे आपण स्वतः निवडतो. ज्या गोष्टी, ज्या चर्चा आपण कुटुंबासोबत करू शकत नाही, त्यासर्व गोष्टी आपण या नात्यात अगदी लीलया करतो. व. पु. यांनी मैत्रीबद्दल अगदी थोडक्यात अतिशय सोप्या शब्दात मैत्री मांडत लिहिले आहे की, ‘मित्र नेहमी अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढवणारे नसावेत, स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील, पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र दैवानेच लाभतात.’

चित्रपटांच्या ग्लॅमर जगात जिथे सख्खे नाते सुद्धा कधी आपल्याला धोका देतील ते सांगता येत नाही. अशा या झगमगाटी दुनियेत देखील अशी काही मैत्रीची उदाहरण आहेत, ज्यांनी त्यांच्या मैत्रीने या क्षेत्रातील मैत्रीची व्याख्या बदलून टाकली. या नात्याला एक वेगळी नजर दिली आहे. आज फ़्रेंडशिप डेच्या निमित्ताने जाणून घेऊया अशीच काही उदाहरण. (these actors best friends in real life)

करीना कपूर खान – अमृता अरोरा
बॉलिवूडमधील सुपरहिट अभिनेत्री करीना कपूरच्या इंडस्ट्रीमध्ये अनेक मित्र मैत्रिणी आहेत. मात्र तिची मैत्री सर्वात जास्त चांगली आहे, ती अमृता अरोरासोबत. करीना आणि अमृताला अनेक वेळा वेगवेगळ्या पार्टीला, हॉलिडे, एकमेकींच्या घरी पाहिले जाते. सोशल मीडियावरही या दोघी अनेकदा त्यांचे फोटो पोस्ट करताना दिसतात. इंडस्ट्रीमध्ये करीना कपूरची गर्ल गॅंग खूपच प्रसिद्ध आहे. करीना, अमृता, करिश्मा आणि मलायका या चौघींची मैत्री सर्वानाच माहित आहे. मात्र त्यातही करीना आणि अमृता एक वेगळाच बॉण्ड शेअर करतात. करीनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मला अमृता खूप आवडते. ती खूप मस्त आणि प्रामाणिक असून, माझ्यासारखीच आहे.

सलमान खान – शाहरुख खान
या दोघांबद्दल काय काय आणि किती किती सांगणार. सलमान आणि शाहरुखची खूपच जुनी मैत्री आहे. या दोघांच्या मैत्रीला प्रत्येक टप्प्यावर एक परीक्षा द्यावी लागली. मात्र तरीही या दोघांची मैत्री संपली नाही. मोठे भांडण देखील झाले, पण काही काळाने ते पुन्हा सोबत आले. आज सलमान आणि शाहरुख इंडस्ट्रीमधील सर्वात जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. ते नेहमी जिथे संधी मिळेल तिथे एकमेकांच्या चित्रपटांना प्रमोट करताना दिसतात. शिवाय ते अनेकदा त्यांच्या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत देखील दिसतात.

करण जोहर – काजोल
करण आणि काजोल यांची मैत्री देखील सर्वश्रुत आहे. करणसाठी काजोल नेहमीच एक लकीचार्म ठरली आहे. ती करणच्या चित्रपटांमध्ये अनेकदा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतच असते. या दोघांच्या मैत्रीमध्ये देखील खूप उतार चढाव आले. करणचा ‘ए दिल है मुश्किल’ आणि अजयचा ‘शिवाय’ हे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले. त्यामुळे करण आणि काजोल यांच्या मैत्रीत काही काळ तणाव देखील आला होता. मात्र आता सर्व गोष्टी सामान्य आहेत. अजय आणि काजोल करणच्या शोमध्ये देखील आले होते.

अनन्या पांडे-सुहाना खान- शनाया कपूर
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे, संजय कपूरची मुलगी शनाया पांडे आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान या तिघींची मैत्री देखील जगजाहीर आहे. या तिघी अनेकदा सोबत पार्टी करताना दिसतात. अनन्याने चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे.  शनाया देखील लवकरच सिनेमात दिसणार आहे, तर सुहानाच्या पदार्पणाबद्दल अजून काही माहिती नाही.

अर्जुन कपूर- रणवीर सिंगअर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांची मैत्री देखील इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. सुरुवातीपासूनच हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहे. यांनी ‘गुंडे’ या सिनेमात सोबत काम केले, त्यानंतर यांची मैत्री अधिक घट्ट झाली. या सिनेमानंतर त्यांनी ‘फाइंडिंग फेनी’ सिनेमात सोबत काम केले. करण जोहरच्या शोमध्ये सुद्धा त्यांनी खूप धमाल केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीने शेअर केला वाढदिवसाचा लेट नाईट पार्टी व्हिडिओ; सिद्धार्थनेही लावली हजेरी

-कियारा आडवाणीने शेअर केला वाढदिवसाचा लेट नाईट पार्टी व्हिडिओ; सिद्धार्थनेही लावली हजेरी

-जरीन खानने स्टायलिश लूकमध्ये दाखवला तिचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज

हे देखील वाचा